Home /News /mumbai /

पुणे आणि ठाण्यासह या भागात पावसाचा हवामान खात्याने दिला इशारा

पुणे आणि ठाण्यासह या भागात पावसाचा हवामान खात्याने दिला इशारा

गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. अनेक पीकं ही काढणीला आली असून शेतकऱ्यांसमोर नवं संकट निर्माण झालं होतं.

    मुंबई 03 ऑक्टोबर: गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात उष्णता वाढलेली असताना हवामान खात्याने शनिवारी पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला. पुणे, ठाणे, पालघर, रायगड आणि कोकणातल्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाचे उपमहासंचालक के. एस होसाळीकर यांनी दिला आहे. वातावणात झालेल्या बदलांमुळे पाऊस येणार असल्याचंही ते म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. विजेच्या कडकडाटासह हा पाऊस असेल असंही हवामान खात्याने म्हटलं आहे. मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला असून तो काही दिवसांमध्ये माघारी फिरेल असं हवामान विभागाने या आधीच सांगितलेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. अनेक पीकं ही काढणीला आली असून शेतकऱ्यांसमोर नवं संकट निर्माण झालं होतं.

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या