14 लाखांची दिली मास्कची ऑर्डर, पण चौकशीत निघाली धक्कादायक माहिती

14 लाखांची दिली मास्कची ऑर्डर, पण चौकशीत निघाली धक्कादायक माहिती

या चौकशीतून मिळालेल्या माहितीमुळे भनोचा यांच्या पायाखालची वाळूच सरकली.

  • Share this:

मुंबई, 17 मार्च  : 'टाळू वरचे लोणी खाणाऱ्यांची संख्या काही कमी नाही' असं म्हणण्याचं कारण की, कोरोना व्हायरसमुळे भीतीदायक वातावरणात मुंबईत असाच एक प्रकार घडला आहे. संपूर्ण जगात 'कोरोना'ने हैदोस घातला असून हजारो लोकांचे जीव चाललेत पण याही परिस्थितीत काही भामटे पैसे कमवण्याासाठी माणुसकीची सीमा ओलांडत आहे.

मुंबई पोलिसांनी नुकतचं एका प्रकरणाचा छडा लावला आहे. या प्रकरणी  बोदले अब्रारार मुस्तफा याला अटक करण्यात आली आहे. हजारो लोकं कोरोनाच्या संसर्गाने मरत असताना या मुस्तफाने पैसे कमावण्यासाठी संतापजनक प्रकार केला आहे.

जगभरात कोरोनाने थैमान घातल्याने फ्रांस आणि ओमान या देशातून वडाळा इथं राहणारे नवीनचंद्र भनोचा यांच्या सदगुरु इम्पेक्स या कंपनीकडे कोरोनापासून सरंक्षण कराणाऱ्या मास्कची मागणी करण्यात आली होती. ती मागणी स्वीकारुन नवीनचंद्र भनोचा यांनी मास्क विक्री करणारे तसेच मास्क बनवण्याकरता लागणारे साहित्य विकणाऱ्यांची माहिती नवीनचंद्र यांनी इंटरनेटवरुन घेतली.

त्यानुसार, आयएसओ आणि जीएसटी प्रमाणपत्र असलेली भक्ती एंटरप्रायझेस या कंपनीची माहिती मिळवली. त्यांनी या कंपनीशी संपर्क करुन जवळपास 14 लाख 40 हजार रुपये किंमतीचे 1 लाख 40 हजार मास्क हवे असून त्याची ऑर्डर संबंधित कंपनीला दिली होती, त्यासाठी अॅडव्हान्स म्हणून ऑनलाईन पे पद्धतीचे माध्यमातून जवळपास 4 लाख रुपये आरोपीच्या खात्यात जमा केले होते.

अनेकवेळा संपर्क करून पण मागणीनुसार, मास्कचा पुरवठा का केला जात नाहीत याबाबत नवीनचंद्र भनोचा यांनी भक्ती एंटरप्रायजेस या कंपनीची चौकशी केली. या चौकशीतून मिळालेल्या माहितीमुळे भनोचा यांच्या पायाखालची वाळूच सरकली. कारण, भक्ती एंटरप्राइजेस अशी कोणतीच कंपनी अस्तित्त्वात नसून त्या कंपनीने इंटरनेटरवर दिलेली जीसएटी प्रमाणपत्र आणि आय एस ओ प्रमाणपत्र ही सर्व कागदपत्रे खोटी होती.

आपली फसवणूक झाली आहे हे कळताच नवीनचंद्र भनोचा यांनी तात्काळ वडाळा ट्रॅक टर्मिनस पोलीस स्टेशन गाठले आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. घटनेची तक्रारार मिळताच पोलिसांनी भक्ती एंटरप्रायजेस या कंपनीची माहिती घेऊन शोधा शोध सुरू केली असता जे जे मार्ग येथून बोदले अब्रारार मुस्तफा या तरुणाला अटक केली.

कोरोनाच्या प्रार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाने 1 लाख रुपयांचे बनावट सॅनिटायजर आणि कोरोनापासून बचाव करणाऱ्या गोळी सांगून लोकांची फसवणूक करणाऱ्या शितल आयुर्वेदिक दुकानाच्या मालकालाही अटक केली आहे. कोरोनामुळे लोकांमध्ये पसरलेल्या भितीच्या वातावरणाचा फायदा घेऊन हे अशा प्रकार टाळू वरचे लोणी खाणाऱ्यांना कठोर शासन झाले पाहिजे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

First published: March 17, 2020, 7:03 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading