Sachin Vaze यांनी रेकीसाठी वापरली मर्सिडीज कार, नवी मुंबई कनेक्शन उघड!

Sachin Vaze यांनी रेकीसाठी वापरली मर्सिडीज कार, नवी मुंबई कनेक्शन उघड!

24 फेब्रुवारीला कारमायकल रोडवर जेव्हा हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ जीप जिलेटीनसह सापडली. ही गाडी तिथे उभी करण्यापूर्वी

  • Share this:

नवी मुंबई, 20 मार्च : मुंबईत (Mumbai) स्फोटकांनी कार सापडलेल्या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरणात आतापर्यंत एनआयएने (NIA) तब्बल पाच आलिशान गाड्या जप्त केल्या आहे. यात मुंबईतून जप्त केलेली काळ्या रंगाची मर्सिडीज बेंझ (Mercedes Car) ही आलिशान कार नवी मुंबईतील नर्मदा ऑफशोर या कंपनीच्या नावावर असल्याचे समोर आले आहे.

24 फेब्रुवारीला कारमायकल रोडवर जेव्हा हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ जीप जिलेटीनसह सापडली. ही गाडी तिथे उभी करण्यापूर्वी तब्बल 15 ते 20 दिवसांपूर्वी सचिन वाझे यांनी याच काळ्या रंगाचा मर्सिडीज बेंझ मधून कारमायकल रोडची रेकी केली होती. त्यामुळे या गाडीचा वापर या सगळ्या प्रकरणात असल्याने एनआयएने ही कार जप्त करून तपास सुरू केला आहे. मात्र, ही मर्सिडीज बेंझ कार नर्मदा ऑफशोर कंपनीने 21 नोव्हेंबरलाच कार 24 या जुन्या कार विकत घेणाऱ्या कंपनीला विकली आहे. या व्यवहाराचे पैसे देखील नर्मदा कंपनीला कार 24 कंपनीने दिले आहेत.

Ind vs Eng : इंग्लंडसाठी वनडेमध्ये ‘धोकादायक’ ठरेल हा भारतीय फास्ट बॉलर!

व्यवहार पूर्ण झाल्याने नर्मदा कंपनीने डिलिव्हरी नोट ही संबंधित कंपनीकडून घेतलेली आहे. यामुळे आपल्या कंपनीचा त्या मर्सिडीज बेंझ कारशी कोणताच संबंध नसल्याचा नर्मदा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी देव भंडारी यांनी सांगितले.  मात्र, या बाबत ना एनआयए ना एटीएसने आपणाकडे चौकशी केली नसून या मर्सिडीज बेंझ कारची चौकशी करण्यात आली तर आपण सर्व कागदपत्रे सादर करू, असंही भंडारी यांनी सांगितले.

देशात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट, गाठला साडेतीन महिन्यातील उच्चांक

नर्मदा ऑफशोर या कंपनीच्या म्हणण्यानुसार ही गाडी कार 24 या कंपनीच्या ताब्यात होती. मग ही कार सचिन वाझे यांच्या ताब्यात कशी आली. कंपनीने ही कार कोणाला विकली की आपल्या ताब्यात असताना साची वाझे यांना वापरण्यास दिली. ही गाडी कोणी दिली असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहे. एनआयए याच सर्व प्रश्नांचे उत्तर शोधत आहे. आता कार 24 या कंपनीच्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची ही चौकशी होण्याची शक्यता आहे.

Published by: sachin Salve
First published: March 20, 2021, 8:08 AM IST

ताज्या बातम्या