Home /News /mumbai /

मर्सिडीजने परत मागवल्या 7 लाख 50 हजार कार्स, हे आहे कारण

मर्सिडीजने परत मागवल्या 7 लाख 50 हजार कार्स, हे आहे कारण

मर्सिडीजच्या C-Class, E-Class, CLK-Class and the CLS-Class या गाड्यांमध्ये हा दोष आढळून आला होता.

    मुंबई 05 जानेवारी : अतिशान कार्सच्या क्षेत्रात जगविख्यात असलेल्या Mercedes-Benz कंपनीने जगभरात वितरीत केलेल्या तब्बल 7 लाख 50 हजार कार्स परत मागवल्या आहे. गुणवत्ता आणि सर्व्हिसच्या बाबतीत अतिश दक्ष अशी या कंपनीची ख्याती आहे. त्यामुळे कार्स उत्पादनाच्या गुणवत्तेत थोडीशीही चूक आढळ्यास कंपनी त्याबाबत तातडीने कारवाई करते. 2001 ते 2011 या काळात या गाड्यांची जगभरातल्या अनेक देशांमध्ये विक्री करण्यात आली होती. कारच्या रुफ टॉपमध्ये जो सनग्लास लावण्यात आला होता तो तडकण्याची शक्यता असल्याने कंपनीने सर्वच गाड्या परत मागवून घेतल्या असून आवश्यक ते बदल करून पुन्हा नव्याने त्या गाड्या देण्यात येणार आहेत. मर्सिडीजच्या C-Class, E-Class, CLK-Class and the CLS-Class या गाड्यांमध्ये हा दोष आढळून आला होता. असं झालं तर तो प्रवाशांसाठी धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतलाय. ज्यांनी तो काच बदलून घेतलाय. त्या ग्राहकांना त्यांचे पैसे परत दिले जाणार आहेत असंही कंपनीने स्पष्ट केलंय. सध्या जगभर मंदीचं वातावारण आहे आणि त्याचा सगळ्यात मोठा फटका हा ऑटो सेक्टरला बसलाय. वाहनांच्या विक्रीत मोठी घट झाल्याने अनेक कंपन्यांना फटका बसलाय. तर शेकडो लोकांच्या नौकऱ्या गेल्या आहेत. भारतातही ऑटो सेक्टरला मोठा फटका बसलाय. i phone ची विक्री घटली, थेट सीईओ टिम कुकचा पगार कापला अशी परिस्थिती असताना मर्सिडीजने जगभरातून तब्बल साडेसात गाड्या परत मागवण्याला वेगळं महत्त्व दिलं जातंय. कंपनीला नुकसान सोसावं लागलं तरी चालेल मात्र गुणवत्ता आणि सुरक्षेमध्ये कुठलीही तडजोड करणार नाही हेच कंपनीने दाखवून दिलं अशा प्रतिक्रिया वाहन क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी व्यक्त केल्या आहेत.  
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या