• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • मनसे नेत्याच्या मारेकऱ्याला लखनऊमधून अटक; आरोपीने रा. काँग्रेसचा उल्लेख केल्याने राजकारणात खळबळ

मनसे नेत्याच्या मारेकऱ्याला लखनऊमधून अटक; आरोपीने रा. काँग्रेसचा उल्लेख केल्याने राजकारणात खळबळ

या प्रकरणात 'ओसामा' नावाच्या व्यक्तीने ही सुपारी दिली होती.

  • Share this:
    मुंबई, 3 एप्रिल : उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष दलाने (STF) मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे (मनसे) नेते आणि आरटीआय कार्यकर्ता जमील अहमद शेख याच्या हत्या प्रकरणात आरोपी इरफान सोनू शेख मंसूरी उर्फ राजधनिया याला शनिवारी लखनऊ येथून अटक करण्यात आली. मनसे नेत्याची राज्यातील ठाणे जिल्ह्यात 23 नोव्हेंबर 2020 मध्ये गोळी मारून हत्या करण्यात आली होती. एसटीएफच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, पोलिसांना या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, गोरखपूर जिल्ह्यातील गुलरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निवासी इरफान सोनूने ही मनसे नेत्याची हत्या केली होती. हे ही वाचा-धुळ्यातील काँग्रेस भवनासमोर मृतदेह आढळल्याने खळबळ, मध्यरात्री झाली हत्या एसटीएफनुसार सोनूला सुत्रांनी दिलेल्या माहितीनंतर शनिवारी अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान सोनूने सांगितलं की, 23 नोव्हेंबर रोजी मुंबईत ओसामा नावाच्या एका व्यक्तीने त्याला बोलवून हत्येचे सुपारी दिली होती. सोनूने दिलेल्या माहितीनुसार हत्येसाठी किती पैसे दिले गेले याबाबत त्याला माहीत नाही. त्याला दोन लाख रुपये मिळणार असल्याचंही त्याला माहीत नव्हतं. सोनूने सांगितलं की ही हत्या या एका नेत्याच्या सांगण्यावरुन करण्यात आली होती. अधिकाऱ्याने सांगितलं की, आरोपीला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आलं आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published: