शिक्षणमंत्र्यांवर मेंटल हॅरेसमेंटची केस करावी- आदित्य ठाकरे

शिक्षणमंत्र्यांवर मेंटल हॅरेसमेंटची केस करावी- आदित्य ठाकरे

  • Share this:

18 आॅगस्ट : विद्यापीठाच्या निकालासाठी जबाबदार कोण आहे ?, डेडलाईन देऊनही निकाल लागले नाही. विद्यार्थ्यांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल शिक्षणमंत्र्यांवर मेंटल हॅरसमेंटची केस दाखल करावी अशी टीका शिवसेनेच्या युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केली. तसंच मुंबई विद्यापीठाच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचंही आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

मुंबई विद्यापीठाच्या निकाल घोळावर आदित्य ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली.  मुख्यमंत्र्यांची भेट घेली होती. तेव्हा त्यांच्याकडे विद्यापीठावर आयएएस अधिकारी एडमिनिस्ट्रेटर नेमावा अशी मागणी केली होती तसंच  मेरीट ट्रॅक ही कंपनी कुणाची आहे त्याची चौकशी करावी अशी मागणी केली असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

परदेशी अभ्यासक्रमासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्कशिट नसल्यानं समस्या निर्माण होत आहेत. निकालाची डेडलाईन निघून गेली नंतर 5 आॅगस्ट निघून गेली नंतर मुख्यमंत्र्यांनी एक तारीख दिली ती पण निघून गेली, मुख्यमंत्र्यांना तोंडावर पाडण्याचं कोण काम करतंय का ? असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.

आधीच्या सरकारमध्ये विद्यापीठात कमी घोळ होता. विद्यार्थी महाराष्ट्रातील मोठा घटक त्यांना त्रास होतोय. या त्रासाबद्दल शिक्षणमंत्र्यांवर मेंटल हॅरेसमेंटची केस दाखल करावी अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

First published: August 18, 2017, 6:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading