त्याने' अर्धनग्न होऊन सहाव्या मजल्यावरून मारली उडी, पण...

त्याने' अर्धनग्न होऊन सहाव्या मजल्यावरून मारली उडी, पण...

अंबरनाथमध्ये एका माथेफिरू इमारतीच्या युवकाने 6 व्य़ा मजल्यावरून उडी मारली. अंबरनाथच्या पनवेलकर गार्डनमधील संकुलातला हा धक्कादायक प्रकार आहे. क्लिफर्ड मॅबेन (३७) असं या तरुणाचं आहे.

  • Share this:

गणेश गायकवाड, अंबरनाथ, 13 ऑक्टोबर - एका माथेफिरु युवकाने इमारतीच्या ६ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. पण करायला गेला एक आणि घडलं भलतंच, असं झाल्यामुळं त्या युवकाचे प्राण वाचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या युवकाला पोलिसांच्या स्वाधीन केलंय.

अंबरनाथच्या पनवेलकर गार्डन संकुलात हा धक्कादायक प्रकार घडला. या ईमारतीच्या 6 व्य मजल्यावर क्लिफर्ड मॅबेन हा युवक त्याच्या कुटुंबियांसमवेत राहतो. शनिवारी पहाटे मॉर्निंग वॉक करून परतलेल्या मॅबेनने घरातील लोकांना मारहाण केली आणि अर्धनग्न होत इमारतीच्या ६ व्या मजल्यावरून उडी मारली. आत्महत्या करत्यावेळी त्याला अनेकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्याने कोणाचही ऐकलं नाही आणि रागाच्या भरात उडी टाकली.

पण घडले असे की, उडी मारताच चौथ्या मजल्यावरील टेरेसजवळ असलेल्या वायरमध्ये त्याचा पाय गुंतला आणि तो टेरेसवर पडला. अखेर त्याला खाली काढण्यासाठी अंबरनाथच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. दोन तास शर्तीच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला जवानांनी त्याला खाली उतरवले. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती याची प्रचिती हा प्रकार पाहण्यासाठी जमलेल्या नागरिकांना आली. अग्नीशमन दालाच्य जवानांनी या माथेफिरू युवकाला शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केलेय. क्लिफर्ड मॅबेन हा थोडा विक्षिप्त असल्याची शक्यता वर्तवली जातेय.

यात हा युवक किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान, यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला याचा आता पोलीस तपास करत आहेत. यासंदर्भात पोलीस क्लिफर्डच्या कुटुंबियांचीही चौकशी करणार आहे. तर क्लिफर्डची वैद्यकीय तपासणीही केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

 VIDEO : कुठली मालिका आहे नंबर वन? #TRPमीटर काय सांगतोय बघा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2018 01:46 PM IST

ताज्या बातम्या