Home /News /mumbai /

मध्य रेल्वेवर Mega Block, असं असेल आज रेल्वेचं Time Table

मध्य रेल्वेवर Mega Block, असं असेल आज रेल्वेचं Time Table

Mumbai Local Train Update

Mumbai Local Train Update

Megablock News:आज रविवार (Sunday) ...रेल्वेनं आज मेगाब्लॉक (Megablock Today) घेण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेवर (Central Railway) आज चौदा तासांचा मेगाब्लॉक आहे.

    मुंबई, 23 जानेवारी: आज रविवार (Sunday) ...रेल्वेनं आज मेगाब्लॉक (Megablock Today) घेण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेवर (Central Railway) आज चौदा तासांचा मेगाब्लॉक आहे. ठाणे आणि दिवा (Thane and Diva) दरम्यान डाऊन फास्ट लाईनवर हा मेगाब्लॉक आहे. शनिवारी मध्यरात्री 1.20 मिनिटांनी या मेगाब्लॉकची सुरुवात झाली. तर आज रविवारी 3.20 मिनिटांपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. हा मेगाब्लॉक दुपारी 12.30 मिनिटांनी मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या अप फास्ट लाईन सुरु होईल तर 2.30 मिनिटांनी तो संपेल. या मेगाब्लॉकच्या काळात अप आणि डाऊन दिशेला स्लो लाईनवर लोकल ट्रेन सुरु असतील. ''...मग काय औरंगजेबचा पुतळा उभारायचा का?'': शिवसेना  मेगाब्लॉकच्या काळात दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि CSMT येथून सुटणाऱ्या एक्सप्रेस तसेच फास्ट लोकल या मुलुंड आणि कल्याणच्या दरम्यान डाऊन स्लो लाईनवर डायव्हर्ट करण्यात येणार आहेत. तर मेगाब्लॉकच्या दरम्यान ठाणे स्टेशनच्या दोन नंबर प्लॅटफॉर्मवर एक्सप्रेस आणि मेल गाड्या थांबणार नसल्याचं मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. आज मध्य रेल्वे ठाणे आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान डाऊन फास्ट लाईनवर 14 तासांचा पायाभूत सुविधा ब्लॉक करण्यात येणार आहे. या दरम्यान ठाणे-दिवा स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर 2 तासांचा पायाभूत सुविधा ब्लॉक आहे. जुनी लाईन सध्याच्या फास्ट लाईनशी जोडण्यासाठी आणि ठाणे-दिवा 5व्या आणि 6व्या लाईनच्या संदर्भात क्रॉसओव्हर सुरू करण्यासाठी हे काम केलं जात आहे. येत्या काळात कामांसाठी जम्बो मेगाब्लॉक मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या लाईनच्या कामांसाठी अनेक मोठे जम्बो मेगाब्लॉक आजपर्यंत घेण्यात आलेत. मात्र अजूनही दोन मेगाब्लॉक घेण्याचं बाकी असल्याचं मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. त्यापैकी पहिला मेगाब्लॉक 22 आणि 23 जानेवारीला आहे. तर दुसरा मेगाब्लॉक हा 72 तासांचा असणार आहे. 72 तासांचा मेगाब्लॉक फेब्रुवारीच्या 4 ते 6 तारखेला घेण्याची शक्यता आहे. या दोन जम्बो मेगाब्लॉकनंतर पाचवी आणि सहावी लाईन कार्यान्वित होईल, असं MRVC कडून सांगण्यात आलं आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Mumbai, Mumbai local

    पुढील बातम्या