वेळापत्रक पाहून बाहेर पडा! पश्चिम रेल्वे आणि ट्रान्स हार्बरवर मार्गावर मेगा ब्लॉक

वेळापत्रक पाहून बाहेर पडा! पश्चिम रेल्वे आणि ट्रान्स हार्बरवर मार्गावर मेगा ब्लॉक

मेगा ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वे आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 08 डिसेंबर: मुंबईत रविवारी वेळापत्रक पाहून बाहेर पडण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे. पश्चिम रेल्वे आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असल्यानं अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या नियोजित वेळेपेक्षा लवकर तर काही गाड्या उशिरानं सोडण्यात येत आहेत. मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक नसल्यानं प्रवाशांना दिलासा आहे.

मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक नाही.

ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक

ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी सकाळी तांत्रिक कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी 11.10 ते दुपारी 3.40 पर्यंत हा ब्लॉक असेल. ब्लॉक दरम्यान या मार्गावरील प्रवाशांना हार्बर आणि मध्ये रेल्वेवरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. ठाणे, वाशी ते पनवेल मार्गावर हा ब्लॉक असेल. ठाणे ते वाशी, नेरुळ अप आणि डाऊन मार्गावर तर ठाणे ते वाशी, बेलापूर, पनवेल डाऊन मार्गावर ब्लॉक असेल. ब्लॉक दरम्यानच्या काळात ठाणे-वाशी-बेलापूर-नेरुळ-पनवेल मार्गावरील ट्रान्स हार्बरवर अप आणि डाऊन अशा मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना हार्बर आणि मध्य रेल्वे मार्गावरील लोकलने प्रवास करण्याची मुभा रविवारी मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

रविवारी पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आल्यानं धीम्या मार्गावरील अनेक लोकल फेऱ्या रद्द केल्या जात आहेत. पश्चिम रेल्वेवर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर, रुळ आणि इतर तांत्रिक कामांसाठी हा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. सांताक्रूझ ते माहीम दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉकदरम्यान या मार्गावरील सर्व लोकलच्या फेऱ्या धीम्या मार्गावरून वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहून बाहेर पडावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 8, 2019 06:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading