S M L

मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक

Samruddha Bhambure | Updated On: May 7, 2017 10:01 AM IST

मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक

07 मे : मुंबईतील तीनही रेल्वेमार्गांवर आज दुरुस्तीच्या कामांसाठी  विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेन लाइनवर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन फास्ट मार्गावर, हार्बर मार्गावर सीएसटी ते चुनाभट्टी, वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वे :

कुठे- माटुंगा ते मुलुंड डाऊन फास्ट मार्गावर

कधी- सकाळी सव्वा दहा ते दुपारी सव्वा तीन

- छत्रपती शिवाजी टर्मिनस इथून सुटणाऱ्या डाऊन फास्ट आणि सेमीफास्ट गाड्या माटुंगा इथून डाऊन धिम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहे. मुलुंडपासून या गाड्या पुन्हा डाऊन फास्ट ट्राकवर वळवण्यात येतील.

Loading...
Loading...

पश्चिम रेल्वे :

कुठे- सांताक्रूझ ते माहीम अप आणि डाऊन फास्ट मार्गावर

कधी- सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५

- या दरम्यान सांताक्रूझ ते माहिमदरम्यान अप आणि डाऊन फास्ट ट्राकवरची वाहतूक अप आणि डाऊन स्लो मार्गावर वळवण्यात येणार आहे.

हार्बर रेल्वे :

कुठे - छत्रपती शिवाजी टर्मिनस-चुनाभट्टी आणि वांद्रे डाऊन तसंच चुनाभट्टी, वांद्रे ते छत्रपती शिवाजी टर्मिनस अप मार्गावर

कधी- सकाळी  ११.१० ते दुपारी ४.१०

- छत्रपती शिवाजी टर्मिनस इथून पनवेलला जाणारी डाऊन वाहतूक (सकाळी ११.२१ ते दुपारी ४.३९) तसंच छत्रपती शिवाजी टर्मिनस इथून वांद्रे, अंधेरी इथे जाणाऱ्या सर्व गाड्यांची डाऊन वाहतूक (सकाळी १०.३८ ते ४.४३) पूर्णपणे बंद राहणार आहे. तसंच पनवेलवरून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे (सकाळी ९.५२ ते दुपारी ३.२६) आणि वांद्रे, अंधेरीवरून छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांची वाहतूकही (सकाळी १०.४४ ते दुपारी ४.१३) बंद ठेवण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना मुख्य मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 7, 2017 10:01 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close