मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांचे मेगा हाल, वेळापत्रक पाहून बाहेर पडा

मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांचे मेगा हाल, वेळापत्रक पाहून बाहेर पडा

तांत्रिक कामांसाठी आज मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगा ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक.

  • Share this:

मुंबई, 01 नोव्हेंबर: रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवासी आणि चाकरमन्यांनी वेळापत्रक पाहून बाहेर पडण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

मध्य रेल्वेवर सकाळी 11.20 ते दुपारी 3.50 मेगा ब्लॉक

कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर सकाळी 10.54 ते 3.52 मेगा ब्लॉक असणार आहे. जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावरून वळवण्यात आल्या आहेत. ठाणे ते छत्रपती शिवजी महाराज टर्मिन्सला जाणाऱ्या लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर, आणि भायखळा स्थानकात वेळेआधी 20 मिनिटं लवकर पोहोचतील.

दादार-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन आज दुपारी 3.40 मिनिटांनी दादरहून निघणार आहे.

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन मेगाब्लॉत

सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर आणि रेल्वे रुळाच्या कामांसाठी वसई ते विरार आज विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. हा मेगा ब्लॉक रात्री असणार आहे. त्यामुळे दिवसा पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक असणार नाही.

हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 3.40 मेगा ब्लॉक

सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर, वाशी मार्गावर मेगा ब्लॉकदरम्यान लोकल सेवा बंद राहिल. सकाळी 10.17 ते दुपारी 3.00 लोकल सेवा बंद राहिल. वाशी ते पनवेल मार्गावर या वेळात विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत.

हर्बर आणि मध्य मार्गावर ब्लॉक दरम्यान लोकलचं वेळापत्रक बदलणार असल्यानं वेळापत्रक पाहून बाहेर पडावं असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 1, 2019 08:21 AM IST

ताज्या बातम्या