मुंबईकरांनो वेळापत्रक पाहून बाहेर पडा! हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो ब्लॉक

मुंबईकरांनो वेळापत्रक पाहून बाहेर पडा! हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो ब्लॉक

मध्य-पश्चिम आणि हार्बर मार्गावर रविवारी तांत्रिक कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 15 डिसेंबर: तांत्रिक कामांसाठी रविवारी पश्चिम रेल्वेवर जम्बो तर मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सिग्नल यंत्रणेची दुरुस्ती, ओवरहेड वायर, रुळाची दुरुस्ती मेगा ब्लॉक कालावधीमध्ये केली जाणार आहे. दरम्यान यावेळी लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून काही लोकल रद्दही होण्याची शक्यता आहे. प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी लोकल आणि मेगाब्लॉकचं वेळापत्रक पाहून बाहेर पडण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

कसं असेल मेगाब्लॉकचं वेळापत्रक

पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3. 35 पर्यंत जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप, डाऊन जलद मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉकदरम्यान जलद मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तर काही गाड्या रद्द करण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेवर सकाळी 11.25 ते दुपारी 3. 55 पर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. कल्याण ते दिवा अप जलद मार्ग, मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉकदरम्यान कल्याण ते ठाणे जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावरून वळवण्यात येणार आहे. या गाडय़ा सर्व स्थानकांवर थांबतील. ठाणे ते सीएसएमटी या गाड्या जलद मार्गावरून धावतील अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ट्रान्स हार्बर मार्गावर सकाळी 11.30 ते संध्याकाळी 4.00 पर्यंत तांत्रिक कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉकदरम्यान पनवेल, बेलापूरहून सीएसएमटीच्या दिशेनं जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी ते वाशी या काळात विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. ठाणे ते पनवेल दरम्यान अप-डाऊन मार्गावर ब्लॉकदरम्यान लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 15, 2019 07:11 AM IST

ताज्या बातम्या