आज मध्य आणि ट्रान्स हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक

आज मध्य आणि ट्रान्स हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक

मुलुंड-माटुंगा धिम्या मार्गावर आणि ठाणे-वाशी/नेरूळ अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुलुंड-माटुंगा अप धिम्या मार्गावर सकाळी ११.२० ते सायंकाळी ४.२० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 19 ऑक्टोबर: आज रेल्वेच्या मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर कामांसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम आणि हार्बर मार्गावर कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही. त्यामुळे पश्चिम आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांची ब्लॉकपासून सुटका झाली आहे.

मध्य रेल्वेच्या मुलुंड-माटुंगा धिम्या मार्गावर आणि ठाणे-वाशी/नेरूळ अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुलुंड-माटुंगा अप धिम्या मार्गावर सकाळी ११.२० ते सायंकाळी ४.२० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. ठाणे रेल्वे स्थानकावरून सकाळी १०.४८ पासून ते सायंकाळी ४.०२ वाजेपर्यंत अप धिम्या मार्गावर सुटणाऱ्या सर्व उपनगरीय लोकल मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. ट्रेन निर्धारित वेळेपेक्षा २० मिनिटं उशिराने पोहोचतील. ठाण्याहून सकाळी १०.३५ ते दुपारी ०४.०७ दरम्यान वाशी/नेरूळ येथे जाणाऱ्या तसेच वाशी/नेरूळ येथून सकाळी १०.४५ ते दुपारी ४.०९ वाजेपर्यंत ठाणे येथे जाणाऱ्या सर्व उपनगरीय लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉक काळात ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांना हार्बर मार्गावर प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

First published: November 19, 2017, 12:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading