मुंबईत आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबईत आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर स. ११.१५ ते दु. ४.१० वाजेपर्यंत दुरुस्तीची कामं करण्यात येणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 12 नोव्हेंबर: मुंबईकरांची लाईफ लाईन असलेली लोकलच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक असणार आहे. आज रेल्वेच्या मध्य, पश्चिम, हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

सकाळी साधारण १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर स. ११.१५ ते दु. ४.१० वाजेपर्यंत दुरुस्तीची कामं करण्यात येणार आहेत.

तर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर स.११.१० ते दु. ४.४० मध्ये ब्लॉक चालेल. स. ९.५६ ते दु. ४.४३ वाजेपर्यंत सीएसएमटी ते चुनाभट्टी दरम्यानची अप आणि डाऊन मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद असेल. त्यासह वाशी, बेलापूर आणि पनवेलसाठी लोकल धावणार नसून सीएसएमटी ते वांद्रे-अंधेरी दरम्यानची अप आणि डाऊन मार्गांवरील वाहतूक स.९.५३ ते दु. ५.०९ वाजेपर्यंत बंद असेल.

तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानेकांत स. १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन दोन्ही फास्ट मार्गांवर जम्बोब्लॉक चालणार आहे.

First published: November 12, 2017, 9:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading