आज रात्री हार्बर, मध्य मार्गांवर विशेष मेगाब्लॉक, शेवटची लोकल सुटणार लवकर

आज रात्री हार्बर, मध्य मार्गांवर विशेष मेगाब्लॉक, शेवटची लोकल सुटणार लवकर

मध्य रेल्वेवरील कुर्ला ते सायन स्थानकांमध्ये असलेला पादचारी पूल तोडण्यात येणार असून त्यासाठी शनिवारी म्हणजेच आज रात्री विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे.

  • Share this:

मुंबई, ता. 26 मे : मध्य रेल्वेवरील कुर्ला ते सायन स्थानकांमध्ये असलेला पादचारी पूल तोडण्यात येणार असून त्यासाठी शनिवारी म्हणजेच आज रात्री विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. या कालावधीत हार्बर, मध्य रेल्वेवरील लोकल, मेल/एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे या दिवशी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

आज रात्री हार्बरच्या दोन्ही मार्गांवर आणि मध्य रेल्वेच्या अप जलद मार्गावर रात्री ११.३० ते रविवारी पहाटे ५.३० पर्यंत ब्लॉक चालेल. मध्य रेल्वेच्या डाऊन जलद आणि अप-डाऊन धीम्या मार्गावर रात्री १.३० ते पहाटे ३.३० पर्यंत ब्लॉक चालेल.

हार्बर, मध्य मार्गांवर आज रात्री विशेष ब्लॉक

- हार्बरच्या दोन्ही मार्गांवर आणि मध्य रेल्वेच्या अप जलद मार्गावर ब्लॉक

- शनिवारी रात्री 11.30 ते रविवारी पहाटे 5.30 पर्यंत ब्लॉक

- मध्य रेल्वेच्या डाऊन जलद आणि अप-डाऊन धीम्या मार्गांवर रात्री 1.30

ते पहाटे 3.30 पर्यंत ब्लॉक

- हार्बरवरील वडाळा ते मानखुर्द स्थानकांमध्ये दोन्ही मार्गांवरील वाहतूक

पूर्णपणे बंद

- डाऊन हार्बरवर शनिवारी रात्री 10.58 ते रात्री 12.40 आणि पहाटे 4.32 ते

5.56 पर्यंत ब्लॉक

- अप हार्बरवर शनिवारी रात्री 9.59 ते रात्री 12.03 आणि पहाटे 3.51 ते

5.15 वाहतूक बंद

रविवारी मेल-एक्स्प्रेसवरही परिणाम, 'या' एक्स्प्रेस गाड्या होणार रद्द

- पुणे-सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्स्प्रेस

- मनमाड-सीएसएमटी- मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस

- पुणे-सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस

- मनमाड-सीएसएमटी-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस

- मनमाड-एलटीटी-मनमाड गोदावरी एक्स्प्रेस

 

First published: May 25, 2018, 11:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading