30 एप्रिल : मध्य रेल्वेच्या मेन लाइन आणि हार्बर मार्गांवर आज, रविवारी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामध्ये मेन लाइनच्या अप स्लो मार्गावर कल्याण ते ठाणे आणि हार्बरवर कुर्ला ते वाशी दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मेन लाइनवर कल्याण ते ठाणे या दरम्यान अप स्लो मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 4.15 वाजेपर्यंत दुरुस्तीची कामं चालणार आहेत. ब्लॉकदरम्यान कल्याणवरून सकाळी 10.45 ते दुपारी 4.15 पर्यंत स्लो आणि सेमी फास्ट लोकल अप फास्ट मार्गावरून चालवल्या जातील. या कालावधीत ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा या स्थानकांवर अप स्लो लोकल थांबणार नाहीत. या स्थानकांवरील प्रवाशांना ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण मार्गे प्रवास करता येईल.
हार्बरवरील ब्लॉकमुळे सीएसटी ते पनवेल दिशेकडील अप-डाउन मार्गांवरील सेवा बंद असतील. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल मार्गांवर विशेष लोकल चालवल्या जातील