कोकण रेल्वे मार्गावर आठ तासांचा मेगाब्लॉक, या गाड्यांवर होणार परिणाम

कोकण रेल्वे मार्गावर आठ तासांचा मेगाब्लॉक, या गाड्यांवर होणार परिणाम

रात्री पाऊणे बारा वाजल्यापासून निवसर ते विलवडे स्थानकांच्या दरम्यान तब्बल आठ तास रेल्वे वाहतूक बंद राहणार आहे.

  • Share this:

चंद्रकांत बनकर,(प्रतिनिधी)

रत्नागिरी,27 डिसेंबर:कोकण रेल्वेवर आज (शुक्रवार) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. कोकण रेल्वेच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या आडवली स्थानकावर नवीन लूप लाइनचे काम केले जाणार आहे. त्यामुळे रात्री पाऊणे बारा वाजल्यापासून निवसर ते विलवडे स्थानकांच्या दरम्यान तब्बल आठ तास रेल्वे वाहतूक बंद राहणार आहे. या दरम्यान धावणाऱ्या 10 गाड्यांच्या वाहतुकीवर मेगाब्लॉकचा मोठी परिणाम होणार आहे. या मेगाब्लॅकमुळे काही रेल्वे गाड्यांनचे वेळापत्रक कोलमडणार आहे.

कोकण रेल्वे प्रशासनाने दिलेली माहिती अशी की, कोकण रेल्वे मार्गावरील आडवली रेल्वे स्थानकात नवीन लूपलाईन टाकण्याच्या कामास शुक्रवार, 27 डिसेंबरच्या मध्यरात्री सुरू होणार आहे. हे काम दुसऱ्या दिवशी सकाळी पावणे आठपर्यंत चालणार आहे. त्यामुळे या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामामुळे निवसर ते विलवडे स्थानकांच्यादरम्यान आठ तास वाहतूक बंद राहणार आहे.

कोकण रेल्वे मार्गाचे तत्काळ दुपदरीकरण शक्‍य नसल्यामुळे विविध स्थानकांवर गाड्यांचे क्रॉसिंग एकाचवेळी करण्याच्या दृष्टीने प्रशासन पावले उचलत आहे. आतापर्यंत रोहा ते ठोकूरपर्यंत अकरा स्थानकांवर नवीन लूपलाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते. विलवडे ते निवसर या सुमारे 25 किलोमीटरच्या टप्प्यात रेल्वे क्रॉसिंगसाठी पुरेशी व्यवस्था नाही. दोन्हींमधील आडवली स्थानकात मुख्य लाईन आणि एक लूपलाईन आहे ,परंतु एखादे इंजिन त्या ठिकाणी आले की, मुख्य लाईनच वाहतुकीसाठी खुली राहते

. या स्थानकाची वाहतूक क्षमता वाढवण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने दुसरी नवीन लूपलाईन टाकण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचे अंतिम टप्प्यातील काम 27 डिसेंबरला करण्यात येणार आहे. त्यासाठी शुक्रवारी रात्री 11 वाजून 45 मिनिटांपासून हा मार्ग बंद केला जाईल. हे काम दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी पावणेआठ वाजता संपेल, असा अंदाज आहे.

मेगाब्लॉकमुळे या एक्‍स्प्रेस गाड्यांवर परिणाम..

मुंबई- मंगलुरू एक्‍स्प्रेस

गांधीधाम- नागरकॉइल एक्‍स्प्रेस

कोचुवेली- डेहराडून एक्‍स्प्रेस

दादर- सावंतवाडी तुतारी एक्‍स्प्रेस

एर्नाकुलम- हजरत निजामुद्दिन मंगला एक्‍स्प्रेस

एलटीटी- मडगाव डबलडेकर

कोचुवेली- इंदूर एक्‍स्प्रेस

मडगाव- रत्नागिरी पॅसेंजर

रत्नागिरी- मडगाव पॅसेंजर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 27, 2019 01:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading