तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक, प्रवाशांचे होणार मेगाहाल

तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक, प्रवाशांचे होणार मेगाहाल

तिन्ही रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक आहे. कोणत्या ठिकाणी किती वाजेपर्यंत आहे मेगा ब्लॉक ? जाणून घ्या.

  • Share this:

मुंबई,10 मार्च : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध कामांनिमित्त मध्य रेल्वे मार्गावर कल्याण ते दिवा तर पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्टेशनदरम्यान मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.  यामुळे मुंबईकरांचे मेगा हाल होणार आहेत.

हार्बर रेल्वे मार्गावर सकाळी 11.40 वाजेपासून  ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत सीएसएमटीहून चुनाभट्टी, वांद्र्याच्या दिशेनं एकही लोकल धावणार नाही. तसंच सकाळी 11.10 वाजेपासून  ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत वांद्रे, चुनाभट्टीहून सीएसएमटी दिशेकडेही एकही लोकल धावणार नाही. हार्बर मार्गावरील सीएसएमटीहून वडाळा, वाशी, बेलापूर, पनवेल दिशेकडे जाणाऱ्या सर्व लोकल सकाळी 11.34 ते दुपारी 4.23 वाजेपर्यंत, तर वडाळा, वाशी, बेलापूर, पनवेलहून सीएसएमटी दिशेकडे सकाळी 9.53 वाजेपासून ते दुपारी 2.44 वाजेपर्यंत जाणाऱ्या सर्व लोकल रद्द केल्या आहेत.

- सीएसएमटीहून वांद्रे, गोरेगावकडे सकाळी 9.56 वाजेपासून ते दुपारी 4.16 वाजेपर्यंत एकही लोकल धावणार नाही. वांद्रे, अंधेरी, गोरेगावहून सीएसएमटी रेल्वे मार्ग सकाळी 10.45 ते दुपारी 4.58 वाजेपर्यंत बंद असेल. मेगाब्लॉकदरम्यान पनवेल आणि कुर्लादरम्यान विशेष लोकल धावतील.

पश्चिम रेल्वे

चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्टेशनदरम्यान विशेष जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. यादरम्यान, सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या धिम्या मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे.धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वेवर सकाळी 10.54 वाजेपासून ते दुपारी 3.43 वाजेपर्यंत कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील लोकल सेवा कल्याण ते ठाणेदरम्यान धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. ठाणे ते सीएसएमटीदरम्यान लोकल जलद मार्गावरुन धावतील.

तर दुसरीकडे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोगद्याजवळही मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 12 मार्च ते 20 मार्च दरम्यान हा मेगाब्लॉक घेतला जाईल.

VIDEO : 'पुलवामा'आधी अजित डोवल आणि पाकच्या सल्लागारासोबत थायलंडमध्ये गुप्त बैठक - राज ठाकरे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 10, 2019 07:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading