Elec-widget

मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक

मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक

मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज रविवारी असलेल्या मेगाब्लॉकमुळे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेले आहेत.

  • Share this:

मुंबई,ता.29 ता.एप्रिल: मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज रविवारी असलेल्या मेगाब्लॉकमुळे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेले आहेत. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण स्थानकांमध्ये डाऊन धीम्या आणि हार्बरवर पनवेल-वाशी या स्थानकांमध्ये अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण स्थानकांमध्ये डाऊन धीम्या मार्गावर स. ११ ते दु. ४ वाजेपर्यंत ब्लॉक चालणार असून लोकल स. १०.३७ ते दु. ३.५६ पर्यंत डाऊन जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर ब्लॉक आहे.

मध्य रेल्वे - मेगाब्लॉक

- ठाणे ते कल्याण स्थानकांमध्ये डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक

- स. 11 ते दु. 4 वाजेपर्यंत ब्लॉक

- लोकल स. 10.37 ते दु. 3.56 पर्यंत डाऊन जलद मार्गावरून चालणार

Loading...

- मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्थानकात थांबा नाही

हार्बर रेल्वे - मेगाब्लॉक

- पनवेल-वाशी या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर ब्लॉक

- स. 11.30 ते दु. 4.30 पर्यंत ब्लॉक

- सीएसएमटी ते वाशी, बेलापूर आणि पनवेलपर्यंत स. 10.03 ते दु. 4.34 पर्यंत लोकल सेवा बंद

- पनेवल/अंधेरी मार्गाच्या सेवा खंडित

- सीएसएमटी ते नेरुळ आणि वाशी विशेष लोकल

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 29, 2018 08:39 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com