आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, प्रवाशांचे हाल

आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, प्रवाशांचे हाल

आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक या मार्गावरील लोकल गाड्या दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावतील.

  • Share this:

मुंबई, 12 मे : आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक या मार्गावरील लोकल गाड्या दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावतील. सिग्नल, ओव्हरहेड वायर यासह अन्य तांत्रिक कामांसाठी १३ मे रोजी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील कल्याण ते ठाणे अप धिम्या मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे.

या मार्गावरील लोकल गाड्या दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावतील. हार्बरवरही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी, वांद्रे अप आणि डाऊन मार्ग आणि पश्चिम रेल्वेवर माहिम जंक्शन ते अंधेरी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे.

मध्य रेल्वेवर  मेगाब्लॉक

- कल्याण ते ठाणे अप धिम्या मार्गावर ब्लॉक

- सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 वाजेपर्यंत ब्लॉक

- कल्याण ते मुलुंडदरम्यान अप धिम्या आणि अर्धजलद लोकल गाड्या अप जलद मार्गावर वळवणार

पश्चिम रेल्वेवर  मेगाब्लॉक

- माहिम जंक्शन ते अंधेरी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक

- सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत ब्लॉक

हार्बर मार्गवर  मेगाब्लॉक

- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी, वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक

- अप मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत ब्लॉक

First published: May 12, 2018, 8:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading