रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर 'उद्या' मेगाब्लॉक! असं असेल वेळापत्रक

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर 'उद्या' मेगाब्लॉक! असं असेल वेळापत्रक

मध्य, हार्बर रेल्वेवर उद्या आणि पश्चिम रेल्वेवर आज मध्यरात्री मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

  • Share this:

28 एप्रिल : मध्य, हार्बर रेल्वेवर उद्या आणि पश्चिम रेल्वेवर आज मध्यरात्री मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण स्थानकांमध्ये डाऊन धीम्या आणि हार्बरवर पनवेल-वाशी या स्थानकांमध्ये अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेवर आज मध्यरात्री १२.३० ते पहाटे ४.३०पर्यंत वसई ते विरार स्थानकांमध्ये ब्लॉक घेण्यात येणार आहेत

पश्चिम रेल्वेवर आज मध्यरात्री मेगाब्लॉक

- वसई ते विरार स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक

- मध्यरात्री 12.30 ते पहाटे 4.30 पर्यंत ब्लॉक

- वाहतूक अप आणि डाऊन जलद मार्गावरून चालणार

मध्य रेल्वे रविवारी मेगाब्लॉक

- ठाणे ते कल्याण स्थानकांमध्ये डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक

- स. 11 ते दु. 4 वाजेपर्यंत ब्लॉक

- लोकल स. 10.37 ते दु. 3.56 पर्यंत डाऊन जलद मार्गावरून चालणार

- मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्थानकात थांबा नाही

हार्बर रेल्वे रविवारी मेगाब्लॉक

- पनवेल-वाशी या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर ब्लॉक

- स. 11.30 ते दु. 4.30 पर्यंत ब्लॉक

- सीएसएमटी ते वाशी, बेलापूर आणि पनवेलपर्यंत स. 10.03 ते दु. 4.34 पर्यंत लोकल सेवा बंद

- पनेवल/अंधेरी मार्गाच्या सेवा खंडित

- सीएसएमटी ते नेरुळ आणि वाशी विशेष लोकल

First published: April 28, 2018, 1:03 PM IST

ताज्या बातम्या