मुंबईच्या तीनही मार्गावर आज मेगाब्लॉक; 'असं' असेल वेळापत्रक

मुंबईच्या तीनही मार्गावर आज मेगाब्लॉक; 'असं' असेल वेळापत्रक

मुंबईत आज लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे आज मुंबईकरांना प्रवास करताना त्रास सहन करावा लागणार आहे.

  • Share this:

18 फेब्रुवारी : मुंबईत आज लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे आज मुंबईकरांना प्रवास करताना त्रास सहन करावा लागणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली ते नायगाव अप आणि डाऊन फास्ट मार्गावर सकाळी 11 ते 3 पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. तर मध्य रेल्वेच्या अप फास्ट मार्गावर परेल स्थानकाजवळ सकाळी 8.30 ते 4.30 पर्यंत पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच ट्रान्स हार्बर मार्गावर वाशी ते नेरूळ दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर 11.10 ते 4.10 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे आजच्या सुट्टीच्या दिवशी जर तुम्ही बाहेर जाण्याच्या तयारीत असाल तर रेल्वेच्या वेळापत्रकानुसारच नियोजन करा.

आज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

- पश्चिम रेल्वेवर बोरीवली - नायगाव दरम्यान मेगाब्लॉक

सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत अप आणि डाऊन फास्ट मार्गावर मेगाब्लॉक

- मध्य रेल्वेवर परळ स्थानकाजवळ मेगाब्लॉक

सकाळी 8.30 ते दुपारी 4.30 पर्यंत अप फास्ट मार्गावर मेगाब्लॉक

- ट्रान्स हार्बरवर वाशी ते नेरुळ दरम्यान मेगाब्लॉक

सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक

First published: February 18, 2018, 7:35 AM IST

ताज्या बातम्या