S M L

उद्धव ठाकरेंसोबतची बैठक निष्फळ, 'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार!

बेस्टच्या कर्मचारी त्यांच्या विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहेत

News18 Lokmat | Updated On: Jan 10, 2019 10:48 PM IST

उद्धव ठाकरेंसोबतची बैठक निष्फळ, 'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार!

मुंबई, 10 जानेवारी : बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संपावर आजही कोणताही निर्णय होऊ शकला नाही. महापौर बंगल्यात पार पडलेल्या 7 तासांच्या बैठकीतही बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळं सलग चौथ्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर मुंबईतील महापौर बंगल्यात पार पडलेल्या बैठकीला खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. त्यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त अजॉय मेहता आणि बेस्ट कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शशांक राव यांच्याशी चर्चा केली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली आहे.

विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेस्ट संप प्रकरणी बेस्टच्या महाव्यवस्थापकांना मुख्य सचिवांनी मंत्रालयात बोलावलं होतं. त्यांनी संपावर तोडगा काढण्यासाठी सुचनाही दिली होती.


राज ठाकरेंची भेट

बेस्टच्या कर्मचारी त्यांच्या विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. आज तिसऱ्या दिवशी सकाळी बेस्टच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतली. राज ठाकरेंनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला असून संघटनेला एकत्र राहण्याचे आश्वासन दिले होते.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची निदर्शन

Loading...

घर रिकामं करण्याच्या नोटीशा मिळाल्यानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी धारावीमध्ये जोरदार निदर्शनं केली. पालिका प्रशासनानं जबरदस्तीनं नोटिशांवर सह्या घेतल्याचा आरोप संपकऱ्यांच्या कुटुंबियांनी केला आहे.

तर वडाळ्यातल्या बेस्ट वसाहतीबाहेर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी ठिय्या आंदोलन केलं आहे. या आंदोलनात महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या.


=====================






बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 10, 2019 10:48 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close