Home /News /mumbai /

विधान परिषद निवडणूक निकालानंतर वर्षावर रात्रभर बैठकांचं सत्र; सुप्रिया सुळेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

विधान परिषद निवडणूक निकालानंतर वर्षावर रात्रभर बैठकांचं सत्र; सुप्रिया सुळेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

निकालानंतर रात्रभर वर्षा बंगल्यावर बैठकांचं सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळालं. रात्रभर वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदारांची बैठका सुरू होत्या

मुंबई 21 जून : राज्यसभेनंतर विधान परिषद (MLC Election Result) निवडणुकीतही देवेंद्र फडणवीस यांची रणनीती यशस्वी झाली आहे. देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वी भाजपचे पाचही उमेदवार विजयी होणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार आपल्या रणनीतीनुसार त्यांनी मताचं समीकरण जुळवून आणलं आणि तब्बल 134 मतांनी भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले. मात्र निवडणुकीत (MLC Election) आघाडी सरकारला मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागलं. विधान परीषद निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही (Results of Legislative Council) उमेदवार काठावर पास झाले आहे. तसंच शिवसनेनेचे 3 आमदार आणि 9 समर्थक अपक्ष आमदारही फुटले आहेत. MLC Election Result : विधान परिषदेच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंचा संताप; शिवसेनेच्या आमदारांची उद्या तातडीने वर्षावर बैठक या निकालानंतर आता शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतप्त झाले आहेत. निकालानंतर रात्रभर वर्षा बंगल्यावर बैठकांचं सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळालं. रात्रभर वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदारांची बैठका सुरू होत्या. या निकालानंतर वर्षा बंगल्यावर काल रात्री मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसे नेते जयंत पाटील आणि सुप्रीया सुळेही आल्या होत्या अशी माहिती, समोर आली आहे. एकदंरीतच या निकालानंतर शिवसेनेतील अंतर्गत कलह समोर आला आहे. विधान परिषद निवडणुकीचा (MLC Election) निकाल म्हणजे महाविकास आघाडी (MLC Election Result) सरकारसाठी मोठी धोक्याची घंटा आहे. आतापर्यंत उद्धव ठाकरे, शरद पवारांकडून विजयाची हमी दिली जात होती. मात्र प्रत्यक्षात आघाडी सरकारला त्यांचं सरकार असूनही आपली मतं टिकवून ठेवता आलेली नाही, असंच काहीचं चित्र आहे. आघाडी सरकारची एक वा दोन नाही तर तब्बल 21 मतं फुटल्याचं समोर आलं आहे. MLC Election Result : विधान परिषदेच्या निवडणुकीत 'चमत्कार' घडवल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं पहिलं मोठं विधान अशात आज मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांची वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली आहे. या निकालाचे मोठे राजकीय परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आजचा दिवस शिवसेनेसाठी महत्वाचा आहे.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Election, Shivsena, Uddhav thackarey

पुढील बातम्या