Home /News /mumbai /

12 आमदाराच्या यादीचा मुहूर्त हुकला, राज्यपाल आणि ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची बैठक रद्द

12 आमदाराच्या यादीचा मुहूर्त हुकला, राज्यपाल आणि ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची बैठक रद्द

आज राजभवनावर  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,  उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार होते

आज राजभवनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार होते

आज राजभवनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार होते.

    मुंबई, 26 ऑगस्ट : गेल्या आठ महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांचा (MLAs appointed by Governor) मुद्या अजूनही प्रलंबित असल्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor bhagat singh koshyari) आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये (mva government) वाद पेटला आहे. आज बऱ्याच दिवसांनी या मुद्यावर बैठकीचा मुहूर्त मिळाला होता. पण, अचानक ही बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आज राजभवनावर  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,  उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार होते. मात्र, राज्यपालांची आधीच नियोजित बैठक असल्यामुळे ही भेट रद्द करण्यात आल्यांचं महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांकडून सांगण्यात आलं आहे. दुसरीकडे राजभवनाकडून दुपार ४ पर्यंत मुख्यमंत्री कार्यालयाकडून वेळ मागितला नव्हतास असा दावा करण्यात आला आहे. IPL 2021 : KKR मध्ये आला 1293 रन देणारा बॉलर, 15 कोटींचा खेळाडू बाहेर! तर अजित पवार यांनी राज्यपालांसोबत १२ आमदारांच्या मुद्यावर बैठक होणार आहे, अशी माहिती दिली होती.  तर राज्यपालांसोबत बैठकीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी खुलासा केला आहे. 'या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात बैठक होणार असल्याची माहिती आहे, त्याबाबत एवढीच माहिती आम्हाला आहे' असं टोपे म्हणाले. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी पुण्यात बोलत असताना, महाविकास आघाडी सरकारलाच 12 आमदारबाबत आग्रही नाही असं राज्यपाल बोलले होते. पण, आता 'शहाण्याना शब्दाचा मार.. फक्त शहाण्यांना, या पुढे 12 आमदारांबाबत शब्द खर्ची घालणार नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी (sharad pawar) कडक इशारा दिला होता. म्हणे मोबाईलमुळे वाढतायत बलात्कार, पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांचा जावईशोध 'यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र दिले होते, तिन्ही पक्षाचे नेते पत्र देऊन आले होते. पण राज्यपाल यांना वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात राहत नाही, असा सणसणीत टोला सुद्धा पवारांनी राज्यपालांना लगावला होता. या वादानंतर आज राजभवनावर बैठकीला मुहुर्त मिळाला होता. पण, नियोजित कार्यक्रमांमुळे आजची बैठक रद्द झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या