जीएसटी विधेयकावर चर्चा करण्यासाठी शिवसेना भवनात बैठक

जीएसटी विधेयकावर चर्चा करण्यासाठी शिवसेना भवनात बैठक

या बैठकीत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जीएसटी विधेयकावर शिवसेनेची भूमिका स्पष्ट करणार आहेत.

  • Share this:

उदय जाधव, 04 मे : शिवसेनेच्या प्रशिक्षण शिबिराचा आजचा तिसरा दिवस आहे. जीएसटी विधेयकावर विशेष अधिवेशनात चर्चा होणार आहे. त्यासाठी पूर्व तयारी करण्यासाठी आज शिवसेनेचे खासदार आणि आमदारांची शिवसेना भवनात बैठक होणार आहे.

या बैठकीत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जीएसटी विधेयकावर शिवसेनेची भूमिका स्पष्ट करणार आहेत. जीएसटी विधेयकामुळे स्वायत्त संस्थेच्या महसुलावर मोठा फरक पडणार आहे. विशेष करून मुंबई महापालिकेची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे.

त्यावर शिवसेना कसा मार्ग काढतेय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

First published: May 4, 2017, 11:16 AM IST

ताज्या बातम्या