Home /News /mumbai /

कोण आहेत रतन टाटांचे धाकटे बंधू? 2 बेडरुमच्या फ्लॅटमध्ये राहतात, मोबाइलही वापरत नाही... असं जगतात आयुष्य

कोण आहेत रतन टाटांचे धाकटे बंधू? 2 बेडरुमच्या फ्लॅटमध्ये राहतात, मोबाइलही वापरत नाही... असं जगतात आयुष्य

एखाद्या उद्योगपतीच्या नातेवाईकाची लाइफस्टाइल ही खूपच हायप्रोफाइल असेल, असं तुम्हाला वाटत असेल. पण तुम्हाला माहिती आहे का, रतन टाटा यांचे छोटे भाऊ जिमी टाटा (Jimmy Tata) हे अवघ्या दोन बेडरुमच्या फ्लॅटमध्ये राहतात.

नवी दिल्ली, 20 जानेवारी: प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा (Ratan Tata) हे नेहमी विविध कारणांनी चर्चेत असतात. टाटा उद्योग समूहाचे (Tata Group of Companies) ते प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांची किंवा त्यांच्या एखाद्या जवळच्या नातेवाईकाची लाइफस्टाइल ही खूपच हायप्रोफाइल असेल, असं तुम्हाला वाटत असेल. पण तुम्हाला माहिती आहे का, रतन टाटा यांचे छोटे भाऊ जिमी टाटा (Jimmy Tata) हे अवघ्या दोन बेडरुमच्या फ्लॅटमध्ये राहतात. देशातील लोकप्रिय उद्योगपती रतन टाटा यांचा कोणता परिचय देण्याची गरज नाही. सध्या त्यांच्यासोबतचा शंतनू नायडू (Shantanu Naidu) या तरुण मुलाचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. 28 वर्षांच्या नायडूने बिझनेस इंडस्ट्रीत स्वतःच वेगळेपण निर्माण केलंय. अनेकांना ही उंची गाठायची असते, पण नायडूने कमी वयात हे यश संपादन केलंय. शंतनू-रतन टाटा यांच्या फोटोबरोबरच आता रतन टाटा यांचे छोटे भाऊ जिमी टाटा यांचीही चर्चा सुरू झालीय. हे वाचा-500 रुपयाच्या नोटेच्या सुट्ट्यांसाठी लॉटरीचं तिकीट घेतलं आणि आयुष्याचं सोनं झालं ग्लॅमर आणि चर्चांपासून दूर मुंबईच्या कुलाबा परिसरात राहणारे जिमी टाटा कायमच ग्लॅमर आणि चर्चांपासून दूर असतात. ते इतकं सामान्य आयुष्य जगत आहेत की, ते दोन बेडरुमच्या फ्लॅटमध्ये राहतात. मीडियापासून लांब असल्यामुळे त्यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. जिमी टाटा हे रतन टाटा यांचे धाकटे भाऊ आहेत, तर नोएल टाटा (Noel Tata) हे त्यांचे सावत्र भाऊ आहेत. 90 च्या दशकात निवृत्त होण्यापूर्वी जिमी टाटा यांनी टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांमध्ये काम केले. ते टाटा समूहातील कंपन्यांचे भागधारक आणि सर रतन टाटा ट्रस्टचे विश्वस्त आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'ते मोबाईलचा देखील वापर करत नाहीत. वृत्तपत्रांच्या माध्यमातून देशाच्या आणि जगाच्या बातम्यांशी ते जोडलेले राहतात.' हे वाचा-Network18 ची रेकॉर्डब्रेक कामगिरी, गेल्या तिमाहीत मोडले कमाईचे सर्व विक्रम स्क्वॉशचे उत्तम खेळाडू रतन टाटा यांच्याप्रमाणे जिमी टाटादेखील अविवाहित आहेत. उद्योगपती हर्ष गोयंका (Businessman Harsh Goenka) यांनी बुधवारी रतन टाटा यांच्या भावाबद्दल ट्विटवरून माहिती दिली. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलं की, 'तुम्ही रतन टाटा यांचे लहान भाऊ जिमी टाटा यांना ओळखता का. कुलाबा परिसरात दोन बेडरूम असणाऱ्या फ्लॅटमध्ये ते राहतात. त्यांना व्यवसायात रस नाही. ते स्क्वॉशचे उत्तम खेळाडू होते, आणि प्रत्येक वेळी मला हरवत होते.' एखादा उद्योजकाची व त्याच्या जवळच्या नातेवाईकांची लाइफस्टाइल ही खूपच हायप्रोफाइल असल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. मोठमोठ्या उद्योगपतींच्या घरातील व्यक्ती सततच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतानाही दिसतात. पण रतन टाटा यांचे भाऊ जिमी टाटा हे मात्र याला अपवाद आहेत.
First published:

Tags: Ratan tata

पुढील बातम्या