Home /News /mumbai /

शरद पवार-उद्धव ठाकरे भेट, 'वर्षा'वर खलबतं, कायदा-सुव्यवस्थेवर चर्चा

शरद पवार-उद्धव ठाकरे भेट, 'वर्षा'वर खलबतं, कायदा-सुव्यवस्थेवर चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

    विनोद राठोड, प्रतिनिधी मुंबई, 29 एप्रिल : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर या दोन बड्या नेत्यांमध्ये बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत राज्यातील सध्याच्या विविध राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर चर्चा झाल्याची देखील माहिती समोर आली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी गोपनीय अहवालांचा उल्लेख करत 3 मे नंतर राज्यात विध्वंसक परिस्थिती निर्माण होण्याची भीती वर्तवली होती. त्यांचा हा इशारा पाहता पवार आणि ठाकरे या दोन बडे नेत्यांमधील बैठक ही महत्त्वाची मानवी जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 1 मे महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची औरंगाबादची सभा महत्त्वाची आहे. पण दुसरीकडे राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे राज्य सरकारची देखील धाकधूक वाढली आहे. परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी औरंगाबादच्या सभेला कडेकोट पोलीस बंदोबस्त असणार आहे. याशिवाय येत्या 3 मेच्या पार्श्वभूमीवर पोलीसही सतर्क झाले आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली. (40 डिग्री तापमानातही एसीशिवाय खोली थंड राहिल, फक्त या गोष्टी फोलो करा) शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात महामंडळाच्या नियुक्त्यांच्या मुद्द्यावरुनही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. ही बैठक पूर्वनियोजित नव्हती. केंद्राच्या तपास यंत्रणा ज्याप्रकारे काम करत आहेत, नेत्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात या विषयावरही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यामध्ये धार्मिक तेढ निर्माण होणार नाही, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, पोलीस यंत्रणांनी कशाप्रकारे काम केलं पाहिजे, याबाबतची चर्चा या बैठकीत झाली. महाविकास आघाडीची 30 एप्रिलला पुण्यात सभा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेच्या आधी पुण्यात अलका टॉकिज चौक परिसरात महाविकास आघाडीची जाहीर सभा होणार आहे. या सभेत महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे प्रमुख नेते आणि मंत्री उपस्थित राहणार आहेत. या सभेत महाविकास आघाडीचे नेते राज ठाकरे यांच्यावर काय टीका करतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. राज ठाकरेंच्या सभेनंतर 14 मे रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. त्यासाठी नियोजन करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आज शिवसेनेच्या खासदारांचा वर्षा बंगल्यावर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या विषयावरही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: MNS, NCP

    पुढील बातम्या