ऑडिशनच्यावेळी या अभिनेत्रीला करायला सांगितला रेप सिनचा सराव आणि...!

ऑडिशनच्यावेळी या अभिनेत्रीला करायला सांगितला रेप सिनचा सराव आणि...!

त्या दोन रुम्समध्ये अगदी कमी माणसं होती आणि एक बेडही होता. तिथे असलेल्यांची बॉडीलँग्वेज मला काही योग्य वाटली नाही.

  • Share this:

मुंबई 13 नोव्हेंबर : दोन वर्षांपूर्वी मी टू ने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली होती. अनेक अभिनेत्रींनी त्यांना आलेल्या लैंगिक गैरवर्तनाचा अनुभव जाहीर केला होता. त्यात अनेक बडे अभिनेते आणि निर्मात्यांची नावं आल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर हे प्रकरण थोडं शांत झालं असतानाच आता एका अभिनेत्रिने तिच्यावर आलेला प्रसंग सांगत खळबळ उडवून दिलीय. एका चित्रपटासाठी ऑडिशन देताना मला त्या लोकांनी रेप सीनची 'रिहर्सल' करून दाखव असं सांगितलं असा धक्कादायक खुलासा मानवी गगरू या अभिनेत्रीने केलाय. असं त्यांनी वारंवार करून दाखव असंही ते म्हणाले होते असंही तिने सांगितलंय. मानवीने 'स्पॉटबॉय' ला दिलेल्या मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केलाय.

मानवी म्हणाली, काही वर्षांपूर्वी मी एका चित्रपटाच्या ऑडिशनसाठी गेली होती. त्यावेळी तिथे असलेल्या लोकांनी मला रेप सीन कसा करतात ते करून दाखव असं सांगितलं. त्यांच्या या प्रश्नाने मला धक्काच बसला. ज्या ठिकाणी ही ऑडिशन होती ती काही ऑफिसची जागा आहे असं वाटत नव्हतं.

भोजपुरी अभिनेत्रिने शेअर केला बाथटबमध्ये स्नान करतानाचा VIDEO व्हायरल

त्या दोन रुम्समध्ये अगदी कमी माणसं होती आणि एक बेडही होता. तिथे असलेल्यांची बॉडीलँग्वेज मला काही योग्य वाटली नाही. मला माझ्या सुरक्षेची काळजी वाटली त्यामुळे मी तिथून पळाले असंही तिने सांगितलं. टकलेपणावर आधारीत असलेल्या 'उजडा चमन' या चित्रपटात मानवीची मुख्य भूमिका आहे.

ऐश्‍वर्या राय बच्चन पुन्हा प्रेग्नंट? अभिषेक-ऐशचा 'तो' PHOTO व्हायरल

मी टूची मोहिम ही सुरूवातीला अमेकिरेक सुरू झाली होती. तिथे हॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी धक्कादायक खुलासे करत अनेक बड्या अभिनेत्यांना उघडं पाडलं होतं. त्यानंतर ही चळवळ बॉलिवूडमध्ये आली होती. त्यानंतर बॉलिवूड हादरून गेलं होतं. ज्यांच्यावर आरोप झाला त्यांच्यावर अनेक निर्मात्यांनी बहिष्कार घातला होता. त्यानंतर हे प्रकरण कोर्टातही गेलं होतं.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 13, 2019, 8:59 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading