मुंबई, 21 जून : मुंबईतल्या माझगाव नौदल गोदीत 'विशाखापट्टणम' या निर्माणाधीन युद्धनौकेवर आग लागली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. युद्धनौकेच्या दूसऱ्या आणि तीसऱ्या डेकवर आग लागली आहे. आग विझवण्यासाठी तात्काळ घटनास्थळावर नौदलाचे अग्निशमन दल आणि मुंबई अग्निशमन दल दाखल झालं आहे. 8 फायर इंजिनसह 17 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
Mumbai: A fire breaks out in an empty ship at Mazagon Dockyard, 5 fire tenders and 4 water tankers are present at the spot. Fire extinguishing operations are underway. No casualties or injuries have been reported. More details awaited.
आग लागल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धूर झाला आहे. तसेच एक जण आत अडकल्याची भातीही व्यक्तं केली जात आहे. पावणे सहाला ही आग लागली तर साडे सातच्या सुमारास आग भडकली असल्याची माहिती देण्यात आली आहे.