मुंबईवर पाणीकपातीचं संकट आणखी गडद? काय म्हणाले महापौर

मुंबईवर पाणीकपातीचं संकट आणखी गडद? काय म्हणाले महापौर

Mumbai Water Cut : पाऊस लांबल्यानं मुंबईतील धरणांमधील पाणीसाठा देखील झपाट्यानं खाली होत आहे.

  • Share this:

मुंबई, प्रणाली कापसे, 27 जून : राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी पावसाचा काही पत्ता नाही. त्यामुळे राज्यातील जनता आणखी हवालदिल झाली आहे. दिवसेंदिवस पावसाचं आगमन लांबणीवर पडत असून त्यामुळे चिंतेत आणखी भर पडत आहे. धरणांनी देखील तळ गाठला असून पाणीसंकट वाढताना दिसत आहे. राज्यात दुष्काळ असल्यानं पावसाकडे सर्वाचं डोळे लागून बसले आहेत. धरणांमधील पाणीसाठी देखील सपाट्यानं खाली होत आहे. मुंबईत देखील पावसाचं आगमन लांबलं असून मुंबईत पाणी कपात करणार का? असा प्रश्न आता विचारला जात आहे. पाणी कपातीच्या या प्रश्नावर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पाणी कपातीचा निर्णय तूर्तास घेतला जाणार नाही. सध्या भातसा धरणाचा राखीव पाणीसाठा वापरला जात असल्याची माहिती देखील विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली आहे. तसंच पाऊस वेळेवर पडेल अशी अपेक्षा देखील यावेळी महापौरांनी व्यक्त केली.

BSNL, MTNL बंद होणार? काय आहे सरकारचा प्लॅन

पावसाकडे डोळे

गेल्यावर्षी पावसानं पाठ फिरवल्यानं राज्यात भीषण दुष्काळ पडला. शेतीचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. शेतकऱ्यांनी आपली जनावरं चारा छावण्यांमध्ये बांधली. त्यामुळे राज्यातील जनतेला देखील पावसाची आस लागून राहिली आहे.

मुख्यमंत्र्यांचा दणका; 9 वाजता कार्यालयात न पोहोचल्यास पगार कापणार!

जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार

राज्यात मान्सून सक्रीय झाल्याची घोषणा हवामान विभागानं केली असली तरी अपेक्षित पाऊस मात्र पडताना दिसत नाही. मुंबई, ठाण्यासह अनेक भागांमध्ये पावसाची प्रतिक्षा कायम आहे. दुष्काळग्रस्त मराठवाडा, विदर्भात दोन दिवसापूर्वी जोरदार पावसानं हजेरी लावली पण, शेतीपूरक असा पाऊस पडताना दिसत नाही. पाऊस लांबल्यानं आता राज्यातील धरणांनी तळ गाठला असून सारी मदार ही पावसावर आहे. वायू चक्रीवादळाचा परिणाम देखील पावसावर झाला आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून 1 ते 4 जुलै दरम्यान मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेनं दिली आहे. तसंच मध्य भारतात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे. तर, आज मुंबई आणि कोकणात रिमझिम पावसाचा अंदाज हा हवामान विभागानं वर्तवला आहे.

करोडपतीच्या सेटवर सयाजी शिंदेंनी केला सरप्राईज संदर्भातला खुलासा

First published: June 27, 2019, 12:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading