News18 Lokmat

मुंबईचे महापौर भानावर आहेत का?, १४ जण गेले असताना म्हणाले ३४ जणांचा मृत्यू

या दुर्घटनेत अनेकांचे प्राण वागवणाऱ्या सुदर्शन शिंदेचं कौतुक करण्यासाठी आले असता महापौरांची जीभ घसरली.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jan 2, 2018 02:05 PM IST

मुंबईचे महापौर भानावर आहेत का?, १४ जण गेले असताना म्हणाले ३४ जणांचा मृत्यू

02 जानेवारी : मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वरांना कमला मिल दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचा आकडा आठवेना. या दुर्घटनेत ३४ लोकांचा मृत्यू झाला असं महापौर म्हणाले. त्यामुळे पत्रकारांमध्ये एकच गोंधळ उडाला. या दुर्घटनेत अनेकांचे प्राण वागवणाऱ्या सुदर्शन शिंदेचं कौतुक करण्यासाठी आले असता महापौरांची जीभ घसरली.

कमला मिल्स कम्पाऊण्डमध्ये गुरुवारी रात्री लागलेल्या आगीनंतर सुदर्शन शिंदे नागरिकांच्या बचावासाठी धावले होते. अनेक जणांना त्यांनी खांद्यावर टाकून बाहेर आणलं, तर जखमींना त्यांनी हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी स्ट्रेचर्सचीही सोय केली. सुदर्शन शिंदे यांनी आगीत अडकलेल्या नऊ नागरिकांचे प्राण वाचवले.

आगीची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या पहिल्या काही पोलिसांपैकी सुदर्शन शिंदे एक होते. घटनेच्या वेळी ते कमला मिल्स परिसरात ड्युटीवर होते. सुदर्शन शिंदे यांच्या या धाडसाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

'मी फायर ब्रिगेडचे जवान पोहचण्याची वाट पाहत होतो. तेव्हा मोबाइल फोनचे टॉर्च सुरु करुन आपण अडकलो असल्याची माहिती देणारे अनेक जण मला दिसले. तितक्यातच अग्निशमन दल घटनास्थळी आलं आणि मी त्या जवानांसोबत पबमध्ये मदतीसाठी धावलो.' असं सुदर्शन शिंदेंनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 2, 2018 02:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...