Home /News /mumbai /

Cyclone Tauktae : समुद्राला उधाण अन् वादळी वाऱ्याचा मारा आणि महापौर पोहोचल्या गेट वे परिसरात, VIDEO

Cyclone Tauktae : समुद्राला उधाण अन् वादळी वाऱ्याचा मारा आणि महापौर पोहोचल्या गेट वे परिसरात, VIDEO

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar)यांनी गेट वे ऑफ इंडिया परिसरात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

    मुंबई, 17 मे : मुंबईत (Mumbai) तौक्ते चक्रीवादळाचे (Cyclone Tauktae) संकट टळलले असले तरी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पावसामुळे झाडं उन्मळून पडली आहे. तर समुद्राला उधाण आले आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar)यांनी गेट वे ऑफ इंडिया परिसरात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबईच्याा महापौर किशोरी पेडणेकर यांनी गेट वे ॲाफ इंडिया परिसरात दाखल झाल्या. वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू असताना किशोरी पेडणेकर यांनी रेनकोट घालून गेट वेच्या परिसरात दाखल झाल्यात. यावेळी त्यांच्यासोबत पालिकेचे इतर कर्मचारी सुद्धा उपस्थितीत होते. शहरावर वादळाचे संकट जरी टळले असले तरी समुद्रकिनारी परिसरात जाऊ नये, गरजेचं काम असल्यास घराबाहेर पडावे, असं आवाहन मुंबई पालिकेकडून करण्यात आले आहे. मुंबई लोकलवर कोसळले झाड दरम्यान,  तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम सकाळपासून जाणवू लागला आहे.  मध्य रेल्वेच्या घाटकोपर ते विक्रोळी दरम्यान धीम्या मार्गावर झाड कोसळल्याची घटना घडली. सकाळी हलक्या स्वरूपात पडत असलेला पाऊस 9 वाजेनंतर जोरदार बरसत आहे. तर वारा ही जोरात वाहत आहे. यामुळे अनेक ठिकाणी झाड कोसळले आहेत. मध्य रेल्वेच्या घाटकोपर ते विक्रोळी दरम्यान धीम्या मार्गावर झाड कोसळल्याने रेल्वेची ठाण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. पालिकेच्या वतीने हे जाड काढण्याचं काम सुरू झालेला आहे तर पूर्व उपनगरात अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने च्या घटना घडल्या आहे.दरम्यान, मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे मध्य रेल्वेनं हायअलर्ट जारी केला आहे. सर्व कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे. सर्व गाड्यांना अलर्ट राहण्याची सूचना देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष दरम्यान, "तौक्ते" चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव तसंच मदत व पुनर्वसन सचिवांकडून सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला.  रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्य़ातील  12 हजार 420 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे अशी माहिती यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. पतीच्या नसबंदीनंतर बायको झाली प्रेग्नेंट; सत्य समोर आल्यानंतर कुटुंब झालं हैराण आज दुपारी मुख्यमंत्री राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठकीतही आढावा घेणार आहेत. रत्नागिरी  जिल्ह्यातील 3 हजार 896  ,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 144 आणि रायगड जिल्ह्यातील  8 हजार  380  लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या बचाव व मदतकार्यासाठी संबंधित जिल्हा व राज्य  प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या