• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • ‘माझा मोबाईल, माझी जबाबदारी’, मनसेचा महापौरांना टोला

‘माझा मोबाईल, माझी जबाबदारी’, मनसेचा महापौरांना टोला

मनसेचे पदाधिकारी संदीप देशपांडे ( Sandeep Deshpande ) यांनी महापौर पेडणेकर यांच्यावर निशाणा साधत त्यांना टोमणा मारला आहे.

 • Share this:
  मुंबई, 03 जून: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) आपल्या रोखठोक भूमिकेमुळे कायम चर्चेत असतात. आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून एका तरुणाला दिलेल्या रिप्लायमुळे किशोरी पेडणेकर ट्रोल झाल्या होत्या. अखेर त्यांनी या प्रकरणावर सारवासारव करत त्यावर स्पष्टीकरण दिलं. मात्र मनसेचे पदाधिकारी संदीप देशपांडे ( Sandeep Deshpande ) यांनी महापौर पेडणेकर यांच्यावर निशाणा साधत त्यांना टोमणा मारला आहे. संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत महापौरांना टोला लगावला आहे. आलं अंगावर. ढकललं कार्यकर्त्यांवर. यापुढे माझा मोबाईल, माझी जबाबदारी, असं ट्वीट देशपांडे यांनी केलं आहे. नेमकं प्रकरण काय? मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केली होती. ही मुलाखत मुंबईतील 1 कोटी लसीकरणाच्या संदर्भातील होती. ज्यामध्ये महापौर किशोरी पेडणेकर यांनी ग्लोबल कंत्राटाला 9 कंपन्यांचा प्रतिसाद मिळाल्याचा उल्लेख केला होता. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या या ट्विटवर एका नेटकऱ्याने त्यांना प्रश्न विचारला की, कुठल्या कंपन्यांना लस पुरवठ्याचं कंत्राट दिलं आहे. यावर संतापलेल्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्याला मराठीत उत्तर देत लिहिलं, "तुझ्या बापाला". हेही वाचा- विराट कोहली आणि रवी शास्त्रीच्या चर्चेचा Audio लीक! ऐका, काय बोलत आहेत दोघं महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर देताना वापरलेल्या या शब्दांमुळे त्यांची चांगलीच फजिती झाली. अखेर त्यांनी आपलं हे ट्विट डीलिट केलं. मात्र, असे असले तरी त्यांच्या या ट्विटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतं. महापौरांचं स्पष्टीकरण मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना किशोरी पेडणेकर यांनी त्या ट्वीटवर खुलासा केला आहे.  'बुधवारी बीकेसीमध्ये एक कार्यक्रम होता. माझ्यासोबत शिवसेनेचे शाखाप्रमुख आणि इतर पदाधिकारी होते. प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी मी माझ्याकडे मोबाईल ठेवत नसते. माझ्या फोनला शक्यतो लॉक नसतो. त्यामुळे कदाचित त्याने फोन चाळला असावा, माझ्या अनेक पोस्टला नेहमी काही आक्षेपार्ह ट्वीट असतात, त्यामुळे त्याने रागाने ट्वीट केले असेल' असा खुलासा पेडणेकर यांनी केला. तसंच, 'तो मुळात शिवसैनिक आहे, त्यामुळे त्या भावनेतून त्याने ट्वीट केले असेल. शक्यतो असं कुणी वागू नये. त्याने जे ट्वीट केले होते, ते मी लगेच डिलीट केलं. आता त्या मुलाला मी माझ्याकडे यायचं नाही असं सांगितलं आहे. कारण, मी विश्वासाने त्याच्याकडे मोबाईल दिला होता. यातून मला मोठा धडा मिळाला आहे की मोबाईल कुणाच्या हातात देता कामा नये, अशी सारवासारवही किशोरी पेडणेकर यांनी केली.
  Published by:Pooja Vichare
  First published: