चेंगराचेंगरीच्या रात्री महापौर बंगल्यावर मेजवानी, आशिष शेलार यांचा आरोप,महापौरांनी आरोप फेटाळला

चेंगराचेंगरीच्या रात्री महापौर बंगल्यावर मेजवानी, आशिष शेलार यांचा आरोप,महापौरांनी आरोप फेटाळला

ज्या दिवशी एलफिन्स्टन चेंगराचेंगरीत 23 लोकांचे जीव गेले, त्या दिवशीच महापौर बंगल्यावर फुटबाॅल खेळाडूंना मेजवानी देण्यात आली, असा आरोप भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलाय. पण शिवसेनेने हे आरोप फेटाळलेत.

  • Share this:

मुंबई, 01 आॅक्टोबर : ज्या दिवशी एलफिन्स्टन चेंगराचेंगरीत 23 लोकांचे जीव गेले, त्या दिवशीच महापौर बंगल्यावर फुटबाॅल खेळाडूंना मेजवानी देण्यात आली, असा आरोप भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलाय. पण महापौर विश्वनाथ महाडेश्वरांनी हे आरोप फेटाळलेत. ते म्हणाले, फुटबाॅल खेळाडूंसाठी फक्त चहापान झालं, मेजवानी रद्द केली होती.

29 सप्टेंबरच्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर भाजप खासदार किरीट सोमय्या गरबा खेळतानाचा व्हिडीओ समोर आला. तर त्याच दिवशी महापौर बंगल्यावर परदेशातून आलेल्या फुटबॉल खेळाडूंसाठी मेजवानी ठेवण्यात आली होती.

या प्रकरणावर सविस्तर प्रतिक्रिया देताना आशिष शेलार म्हणाले की, 'प्रत्येक राजकीय पक्षातील संवेदनशील नेत्यानं अशाप्रकारच्या घटनेनंतर आपली संवेदना दाखवलीच पाहिजे. गरबा खेळणाऱ्या नेत्यांनी आपली संवेदना जागृत ठेवून गरबा खेळावा. आणि परदेशी फुटबॉल खेळाडूंना महापौर बंगल्यात मेजवानी देताना ही संवेदना दाखवलीच पाहिजे.'

पण शिवसेना नेते अनिल परब यांनीही  अशी मेजवानी झाली नसल्याचं सांगितलंय. ते म्हणाले, फुटबाॅलपटूंना मेजवानी नाही पण चहापान देण्यात आलंय. मेजवानीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. आता आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू झाल्याचं दिसतंय.

First published: October 1, 2017, 6:22 PM IST

ताज्या बातम्या