कमला मिलच्या दुर्घटनेनंतर रुफटॉप हॉटेल्सना परवानगी देण्याचा प्रस्ताव मागे?

कमला मिलच्या दुर्घटनेनंतर रुफटॉप हॉटेल्सना परवानगी देण्याचा प्रस्ताव मागे?

कमला मिल दुर्घटनेनंतर आयुक्तांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी भाजपनं केलीय.आयुक्त मेहतांनी दोन महिन्यांपूर्वी रुफटॉप हॉटेलबद्दलच्या धोरणाला मंजुरी दिली होती.

  • Share this:

मुंबई, 31 डिसेंबर : कमला मिल दुर्घटनेनंतर आता रुफटॉप हॉटेल्सबद्दलचा निर्णय मागे घेतला जाण्याची दाट शक्यता आहे.पालिका आयुक्त अजोय मेहतांनी रुफटॉप हॉटेल्सबद्दलच्या धोरणाला मंजुरी दिली होती. मात्र आता हा निर्णय मागे घेण्याबद्दलचा प्रस्ताव आणला जाऊ शकतो, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय.

कमला मिल दुर्घटनेनंतर आयुक्तांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी भाजपनं केलीय.आयुक्त मेहतांनी दोन महिन्यांपूर्वी रुफटॉप हॉटेलबद्दलच्या धोरणाला मंजुरी दिली होती. काँग्रेस आणि भाजपचा या धोरणेला विरोध होता, तर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासाठी हा ड्रिम प्रोजेक्ट होता. त्यामुळेच याबद्दलचा प्रस्ताव पालिका सभागृहात न आणता आयुक्तांनी त्यांच्या अधिकारातून या धोरणाला मंजुरी दिली होती, असं म्हटलं जातं.

आयुक्तांनी त्यांच्या अधिकारात मंजुरीचं परिपत्रक काढलं होतं. त्यात रुफटाॅपवर अन्न शिजवू नये, अग्नी नसावा अशा अटीही आहेत. पण आता भाजप आणि काँग्रेसनं हे परिपत्रकच मागे घ्यावं असं म्हटलंय.

First published: December 31, 2017, 1:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading