Home /News /mumbai /

'लावा ताकद, मविआ सल्तनत', मनसे नेत्यांची ठाकरे सरकारवर खरमरीत FB पोस्ट

'लावा ताकद, मविआ सल्तनत', मनसे नेत्यांची ठाकरे सरकारवर खरमरीत FB पोस्ट

शेवटी एवढंच सांगेन, आम्हाला दाबायला जेवढी ताकद लावाल त्याच्या दुप्पट वेगाने आम्ही उसळी घेऊ, लावा ताकद

शेवटी एवढंच सांगेन, आम्हाला दाबायला जेवढी ताकद लावाल त्याच्या दुप्पट वेगाने आम्ही उसळी घेऊ, लावा ताकद

शेवटी एवढंच सांगेन, आम्हाला दाबायला जेवढी ताकद लावाल त्याच्या दुप्पट वेगाने आम्ही उसळी घेऊ, लावा ताकद

    मुंबई, २० मे - मशिदींवरील अनधिकृत भोंगे काढण्यासाठी मनसेनं (mns) जोरदार आंदोलन केलं. पण, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. महाविकास आघाडी सरकारने आमच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलीस बळाचा वापर केला आणि छळ केला असा आरोप मनसेचे नेते नितीन सरदेसाई (nitin sardesai) यांनी केला आहे. तसंच, महाविकास आघाडी सरकारचा 'सल्तनत' म्हणून उल्लेख केला आहे. मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर करून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. 'महाविकास आघाडी'सल्तनत' लाख बुरा चाहे तो क्या होता है? वही होता है जो मंजूर ए कानून होता है.' 2 मे पासून महाराष्ट्रातील मविआ सल्तनतने आम्हा महाराष्ट्र सैनिकांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लावला होता. अनेकांना स्थानबद्ध केले, अनेकांना अटक केली, जेल मध्ये टाकले, आमच्या पदाधिकाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास दिला (अजूनही देत आहेत). या व अशा अनेक प्रकारे आमचे मानसिक खच्चीकरण करण्याचे प्रयत्न झाले, अशी टीका सरदेसाई यांनी केली. (VIDEO : बाबर आझम भावामुळे अडचणीत, PCB नं मागितलं उत्तर) 'मात्र, आमचे महाराष्ट्र सैनिक या सगळ्याला पुरून उरले. जेल भोगली, तडीपारी भोगली आणि कोणताही अनुचित प्रकार न करता महाराष्ट्रातील अनाधिकृत भोंग्याचा आवाज बंद करून सुद्धा दाखवला. महाराष्ट्रातील 'सल्तनत'ने पोलिसांवर दबाव टाकून नको त्या गुन्ह्यांची कलमे लावून आमच्या महाराष्ट्र सैनिकांना अडकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण आम्ही जसे रस्त्यावर संघर्ष करून न्याय मिळवतो त्याच प्रमाणे आम्ही न्यायालयीन लढाई सुद्धा तेवढ्याच ताकदीने लढुन,संघर्ष करून,न्याय मिळवण्यात यशस्वी झालो, असंही सरदेसाई म्हणाले. (सरकारी नोकरी! 'या' जिल्ह्यातील ESIC मध्ये परीक्षा न देताही मिळेल Jobs; वाचा) महाविकास आघाडी सल्तनतच्या या दमनशाहीला अंगावर घेऊन, महाराष्ट्रातील जनतेला आवाजाच्या त्रासातून मुक्त करणार्‍या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना माझा सलाम. कायदेशीर प्रक्रियेत महाराष्ट्र सैनिकांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार्‍या सर्व वकील मंडळी आणि महाराष्ट्र नवनिर्माण जनहित कक्ष यांचे विशेष आभार आहे.आपले सहकारी अडचणीत असल्याने त्यांच्या सुटकेसाठी धावपळ करणार्‍या सर्व महाराष्ट्र सैनिकांना साष्टांग दंडवत. शेवटी एवढंच सांगेन, आम्हाला दाबायला जेवढी ताकद लावाल त्याच्या दुप्पट वेगाने आम्ही उसळी घेऊ, लावा ताकद, असं म्हणत सरदेसाई यांनी सरकारला आव्हानही दिलं.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या