अत्यावश्यक सेवेत सामील करून घ्या! बंदचं हत्यार उपसत माथाडी कामगारांची मागणी

अत्यावश्यक सेवेत सामील करून घ्या! बंदचं हत्यार उपसत माथाडी कामगारांची मागणी

शासनाचं याकडं लक्ष वेधण्यासाठी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारण्यात आला आहे. कामगारांची या विषयावर बैठक झाली त्यामध्ये हा निर्णय घेतल्याचं माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी सांगितलं आहे.

  • Share this:

नवी मुंबई, 23 एप्रिल : सरकारनं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घटकांना अत्यावश्यक सेवेत (essential services) समाविष्ट केलं नाही. त्यामुळं नवी मुंबईत माथाडी संघटनेनं एक दिवसाचा लाक्षणिक बंद (Mathadi workers called Bandh) पुकारला आहे. सरकारच्या या निर्णयामुळं संबंधित घटकांना रेल्वे प्रवास करता येत नाही. इतरही अडचणींचा सामना करावा लागतो यासाठी हा लाक्षणिक बंद पुकारला आहे. मात्र या बंदमुळं याठिकाणी माल आणणाऱ्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे.

(वाचा-कुंभमेळ्यातून परतल्यानंतर झाला होता कोरोना; श्रवण राठोड यांच्या मुलाचा खुलासा)

सरकारनं ब्रेक द चेन अंतरर्गत नवीन नियमांतर्गत उपाययोजना सुरू केल्या आहेत. यात काही अत्यावश्यक सेवांनाच परवानगी देण्यात आलेली आहे. या अत्यावश्यक सेवांमध्ये एपीएमसी म्हणजेच बाजार समित्यांमधील घटकांचा समावेश केलेला नसल्यामुळं माथाडी संघटनांमध्ये संतापाचं वातावरण आहे. बाजार समितीच्या घटकांना अत्यावश्यक सेवेत सामील करून घेण्याच्या मागणीसाठी संघटनांनी अखेर संपाचं हत्यार उपसलं आहे. त्यानुसार एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारण्यात आला आहे.

(वाचा-धक्कादायक!  आगीत होरपळून पतीचा मृत्यू झाल्याच्या धक्क्याने पत्नीचाही मृत्यू)

बाजार समितीचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये केलेला नाही. त्यामुळं याच्याशी संबंधित घटकांना म्हणजे माथाडी, मापाडी, बाजार समिती मधील इतर घटक या सर्वांना रेल्वे मधून प्रवास करता येणार नाही. त्यामुळं त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळं शासनाचं याकडं लक्ष वेधण्यासाठी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारण्यात आला आहे. कामगारांची या विषयावर बैठक झाली त्यामध्ये हा निर्णय घेतल्याचं माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी सांगितलं आहे.

माथाडी कामगारांच्या अडचणी लक्षात घेता हा बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. पण अशाप्रकारे अचानक पुकारलेल्या बंदमुळं याठिकाणी शेतकरी घेऊन येणाऱ्या शेतमालाचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. तसंच बंद अचानक पुकारण्यात आल्यामुळं व्यापाऱ्यांनीही बंदला पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळं या बंदचा प्रशासनावर नेमका परिणाम होणार का हेही आता पाहावं लागेल.

Published by: News18 Desk
First published: April 23, 2021, 6:55 PM IST

ताज्या बातम्या