आज आझाद मैदानात धडकणार माथाडी कामगारांचा मोर्चा; 'या' आहेत प्रमुख मागण्या

आज आझाद मैदानात धडकणार माथाडी कामगारांचा मोर्चा; 'या' आहेत प्रमुख मागण्या

मुंबईत आज माथाडी कामगारांचा मोर्चा निघणार आहे. मस्जिद बंदर ते विधान भवन असा हा मोर्चा असणार आहे.

  • Share this:

27 मार्च : राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार असले, तरी माथाडी कामगारांचा संघर्ष अद्याप संपलेला नाही. मुंबईत आज माथाडी कामगारांचा मोर्चा निघणार आहे. मस्जिद बंदर ते विधान भवन असा हा मोर्चा असणार आहे. ३६ माथाडी बोर्डांचे विलीनीकरण करण्याच्या धोरणांमुळे कामगार देशोधडीला लागतील, असा त्यांचा आरोप आहे. महामंडळ विलीनीकरणाविरोधात सरकारने काढलेला अध्यादेश मागे घ्यावा, अशी मोर्चेकरांची प्रमुख मागणी आहे.

'राज्यात यापूर्वी काँग्रेसची सत्ता असताना, त्यांनी माथाडी कामगारांना न्याय देण्याची भूमिका घेतली नाही. त्याचीच पुनरावृत्ती विद्यमान सरकारकडून सुरू आहे. माथाडी बोर्ड विलीनीकरण करण्याचा सरकारचा निर्णय माथाडी कामगारांचा गळा घोटणारा आहे. सरकारच्या या निर्णयाला कामगारांचा मोठा विरोध आहे. या विरोधामुळेच मंगळवारी मस्जिद बंदर ते अझाद मैदान मार्गावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चासाठी राज्यातील हजारो कामगार मुंबईत दाखल होणार असून अध्यादेश मागे घेतल्याशिवाय मागे हटणार नाही.' असं माथाडी कामगारांचे नेते अविनाश रामिष्टे यांनी म्हटलं आहे.

 

First published: March 27, 2018, 9:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading