मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /BIG NEWS : मुंबईतील मालाड परिसरात भीषण आग; शेजारी झोपडपट्टी असल्याने मोठा धोका, पाहा VIDEO

BIG NEWS : मुंबईतील मालाड परिसरात भीषण आग; शेजारी झोपडपट्टी असल्याने मोठा धोका, पाहा VIDEO

रबाळे एमआयडीसी परिसरात आग लागल्याची घटना ताजीचं असताना आता मालाड खडकपाड परिसरात (fire at malada khadak pada) नुकतीच भीषण आग लागली आहे.

रबाळे एमआयडीसी परिसरात आग लागल्याची घटना ताजीचं असताना आता मालाड खडकपाड परिसरात (fire at malada khadak pada) नुकतीच भीषण आग लागली आहे.

रबाळे एमआयडीसी परिसरात आग लागल्याची घटना ताजीचं असताना आता मालाड खडकपाड परिसरात (fire at malada khadak pada) नुकतीच भीषण आग लागली आहे.

मुंबई, 16 मार्च: रबाळे एमआयडीसी परिसरात आग लागल्याची घटना ताजीच असताना आता मालाड खडकपाड परिसरात (fire at malada khadak pada) नुकतीच भीषण आग लागली आहे. या आगीच्या ज्वाळा सर्वदूर पसरल्या आहेत. सायंकाळच्या वेळी काळोख परसरल्यामुळे आग विझवण्यात अनेक अडचणी येत आहेत.

ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आणि 7 जम्बो टॅंकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र आग खूपच भीषण असल्याने आग विझवण्यात अनेक अडचणी येत आहेत.

मालाड खडकपाड परिसरात ज्याठिकाणी आग लागली आहे, तो परिसर खूपचं गजबजलेला आहे. या आगीच्या ठिकाणाहून सर्व लोकांना बाहेर काढण्यात आलं असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीच्या बाजूला मोठी झोपडपट्टी आणि लाकडाची वखार असल्याने आग वाढत जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

याशिवाय बेलापूर औद्योगिक वसाहत परिसरातील रबाळे औद्योगिक वसाहतीमध्येही मोठी आग लागली आहे. याठिकाणी एका केमिकल कंपनीला आग लागली आहे. या आगीचं रुप आणखीच भीषण होताना दिसत आहे. या आगीला विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. या केमिकल कंपनीला लागलेल्या आगीने आता बाजूला असलेल्या औषधांच्या कंपनीलादेखील आपल्या विळख्यात घेतलं आहे. याठिकाणीही गेल्या दोन तासांपासून याठिकाणी आग विझवण्याचं काम सुरू आहे. या आगीत कंपनीचं बरंच आर्थिक नुकसान झालं आहे.

First published:
top videos