मुंबईत 7 मजली इमारतीला भीषण आग, घटनेचा 'Exclusive Video' समोर

मुंबईत 7 मजली इमारतीला भीषण आग, घटनेचा 'Exclusive Video' समोर

अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, आग विझवण्यात यश आलं असून यामध्ये कोणीही जखमी झालं नाही.

  • Share this:

मुंबई, 21 ऑगस्ट : मुंबई वारंवार आग लागण्याच्या घटना समोर येत आहेत. आजही मुंबईच्या मस्जिद बंदर स्टेशन बाहेर एका 7 इमारतीला आग भीषण आग लागली आहे. याचे Exclusive व्हिडिओ समोर आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रहिवासी इमारतीला ही आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्रिशमन दल आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आग मोठी नाही पण इमारतीमधून लोकांना रेस्क्यू केलं जात आहे. अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, आग विझवण्यात यश आलं असून यामध्ये कोणीही जखमी झालं नाही.

स्थानिक पोलीस आणि अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल असून अजूनही नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस चौकशी करत असल्याचंही सांगण्यात येत आहे.

अनेक नागरिकांनी या आगीचे व्हिडिओदेखील सोशल मीडियावर शेअर केले आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे इमारतीला भीषण आग लागली आहे.

खरंतर, राज्यात कोरोनाचं संकट आहेच अशात गणेशोत्सवालाही शनिवारपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी डेकोरेशनचं काम सुरू आहे. यामध्ये हवामान खात्याकडूनही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर न पडता साध्या पद्धतीने उत्सव साजरा करा असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 21, 2020, 3:04 PM IST

ताज्या बातम्या