मुंबई, 25 जून : मुंबईच्या रघुवंशी मिलमध्ये मोठी आग लागली आहे. स्काय लाउजला ही आग लागली असल्याचं सांगण्यात येत आहे. लेव्हल 3ची ही आग असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
मुंबईतील लोअर परेल इथे असलेल्या रघुवंशी मिलमधील पी टू या इमारतीला ही आग लागली आहे. इमारतीचा पहिला मजल्यात आग पसरली आहे. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, खाजगी कार्यालय बंद असल्याने सुदैवाने कुणीही यात जखमी झालेलं नाही. जवळच्या इमारतीमध्ये काही कार्यालयत काम करत असलेल्या सर्वाना बाहेर काढण्यात आलं आहे.
दरम्यान, मुंबईमध्ये सतत आगीच्या घटना समोर येत आहेत. अशात लोअर परळ भागातच कमला मिलमध्ये वन अबव्ह इथे झालेला अग्नितांडव अद्यापही कोणी विसरू शकला नाही. 30 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या या अपघातात 14 लोकांनी आपले प्राण गमावले होते. अनेक जण यात गंभीर जखमी होते. तेव्हापासून अशा मिल्समध्ये अनधिकृत बांधकामांविषयी अनेक तक्रारी आहेत. रघुवंशी मिल कंमपाऊंडमध्येही अनेक इमारतींमध्ये अनधिकृत बांधकाम केली आहेत. त्यांच्यावर कारवाई का होत नाही? यांना असं किचकट बांधकाम करायला परवानगी कोण देतं? फायर लायसन्स मिळतात कशी ? याची सखोल चौकशी नव्हे तर थेट कारवाई करा अशी मागणी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.
संपादन - रेणुका धायबर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.