ठाणे रेल्वे स्थानकावर लोकलच्या डब्याला आग; एक डबा जळून खाक

ठाणे रेल्वे स्थानकावर लोकलच्या डब्याला आग; एक डबा जळून खाक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स वरून आलेल्या रेल्वे डब्याला आग आगली आहे. रेल्वेच्या डब्बा क्र. 2010 बी मोटर कोच या डब्याला ही आग लागली होती. या आगीत हा डब्बा जळून खाक झाला आहे.

  • Share this:

ठाणे, 17 जानेवारी : रात्री 1 किंवा 2 च्या सुमारास ठाणे रेल्वे स्टेशन फलाट क्र. 1च्या साईडींग वरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स वरून आलेल्या रेल्वे डब्याला आग आगली आहे. रेल्वेच्या डब्बा क्र. 2010 बी मोटर कोच या डब्याला ही आग लागली होती. या आगीत हा डब्बा जळून खाक झाला आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. आणि आग थांबण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.

आग लागल्यानंतर तात्काळ घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाची 4 फायर वाहनं, 2 वॉटर टँकर, 1 रेस्क्यु वाहन पोहचलं होतं. त्यांच्या अथक प्रयत्नाने ही आग थांबवण्यात आली आहे. पण यात रेल्वेचं मोठं नुकसान झालं आहे.

आता ठाणे स्टेशनची परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. पण शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागण्याचं कारण सांगण्यात येतं आहे.

First published: January 17, 2018, 9:04 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading