मुंबईतल्या नवरंग स्टुडिओला आग; अग्निशमन दलाचा एक अधिकारी जखमी

कमला मिल आग प्रकरण ताजं असतानाचं आगीचं सत्र मात्र थांबता थांबत नाही आहे. काल रात्री सेनापती बापट रोडवरच्या तोडी मिल कंपाऊडल्या नवरंग स्टुडिओला आग लागली.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 19, 2018 09:14 AM IST

मुंबईतल्या नवरंग स्टुडिओला आग; अग्निशमन दलाचा एक अधिकारी जखमी

19 जानेवारी : कमला मिल आग प्रकरण ताजं असतानाचं आगीचं सत्र मात्र थांबता थांबत नाही आहे. काल रात्री सेनापती बापट रोडवरच्या तोडी मिल कंपाऊडल्या नवरंग स्टुडिओला आग लागली. रात्री १.००च्या सुमारास ही आग लागली. आग मोठी असल्यामुळे ती विझवण्यासाठी आठ फायर इंजिन ७ टँकर घटनास्थळी होते. आग पहाटे ५.३० वाजता पूर्णपणे विझवण्यात यश आलं आहे. या आगित एक फायरमनला थोडीशी दुखापत झाली आहे.

लोअर परळमधला नवरंग स्टूडिओ गेल्या काही दिवसापासून बंद आहे. म्हणून सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. पण मग नेमकी ही आग कशी लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानं ही आग विझवण्यात यश आलं आहे.

यंदाच्या वर्षी आग लागण्याचं प्रमाण सातत्यानं घडत असल्यानं सुरक्षतेचे तीन तेरा वाजले आहेत. त्यात जागोजागी अनधिकृत बांधकामांचं जाळं आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सगळा सावळा गोंधळ आहे. सध्या ही आग कशी लागली? याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2018 09:14 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...