#BREAKING: मुंबईत इमारतीच्या 7 आणि 8व्या मजल्यावर भीषण आग, काहीजण अडकल्याची भीती

#BREAKING: मुंबईत इमारतीच्या 7 आणि 8व्या मजल्यावर भीषण आग, काहीजण अडकल्याची भीती

  • Share this:

मुंबई, 22 डिसेंबर : मुंबईत मोठी आग लागल्याची बातमी समोर येत आहे. मुंबईच्या विलेपार्लेमध्ये बजाज रोडवर असलेल्या लाभ श्री विला बिल्डिंगला मोठा आग लागली आहे. सध्या फायर ब्रिगेडच्या 7 ते 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

अग्निशमन दलाच्या टीमकडून आग विझवण्याचे कठोर  प्रयत्न सुरू आहेत. तर यात  इमारतीच्या 7 व्या आणि 8 व्या मजल्यावर ही आग लागली असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, इमारतीमध्ये काहीजण अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. इमारतीच्या 7 व्या आणि 8 व्या मजल्यावर आग लागली असल्यामुळे शिडीचा वापर करत आग विझवण्याचं काम सुरू असल्याचं सांगण्यात येत आहेत.

अग्निशमन दलाने दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, 13 मजली इमारतीच्या 7 आणि 8 व्या मजल्यावर 3 ऑफिसांना ही आग लागली आहे. यामध्ये काही लोक अडकले असल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आगीच्या लोळातून 5 जणांना बाहेर काढण्यात आलं असून त्यांना प्राथमिक उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आजूबाजूच्या इमारती रिकाम्या करण्यात आल्या असून लोकांना सुरक्षित स्थळी हालवण्यात आलं आहे.

दरम्यान, इमारतीत अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू असून यामध्ये अद्याप अग्निशमन दलाने कोणतीही माहिती दिलेली नाही.

(बातमी पुढे अपडेट होत आहे.)

Published by: Renuka Dhaybar
First published: December 22, 2019, 7:51 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading