गोरेगाव परिसरात गोदामांना भीषण आग; आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू

गोरेगाव परिसरात गोदामांना भीषण आग; आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू

गोरेगाव भागातल्या इंडस्ट्रीयल इस्टेटला आग लागली आहे. एका गोदामात ही आग लागली आहे.

  • Share this:

07 फेब्रुवारी : मुंबईमध्ये आगीचं सत्र काही थांबत नाही आहे. गोरेगाव भागातल्या इंडस्ट्रीयल इस्टेटला आग लागली आहे. एका गोदामात ही आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या आणि 6 पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ओबेरॉय मॉलच्या परिसरात ही इटालियन इंडस्ट्रीयल इस्टेट आहे. या औद्योगिक वसाहतीमधील एका गोदामाला आज सकाळी अचानकपणे आग लागली. त्यानंतर ही आग वेगाने पसरत गेली. त्यामुळे थोड्याचवेळात आगीने भीषण स्वरुप धारण केले.

आग मोठी असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणखी काही वेळ लागण्याची शक्यता आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या आगीत इंडस्ट्रीयल इस्टेटमधील दोन गोदामं जळून खाक झाली आहेत. मात्र, आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचं अद्याप कळलेलं नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली, हेदेखील अजूनपर्यंत कळू शकलेले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 7, 2018 09:43 AM IST

ताज्या बातम्या