मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मशीनमध्ये पैसे टाकताच मिळणार मास्क, सॅनिटायझर; मुंबई रेल्वे स्टेशनवर अनोखी वेंडिंग मशीन

मशीनमध्ये पैसे टाकताच मिळणार मास्क, सॅनिटायझर; मुंबई रेल्वे स्टेशनवर अनोखी वेंडिंग मशीन

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्या मुंबईत रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे, त्यांच्यासाठी हे मशीन फायदेशीर ठरणार आहे.

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्या मुंबईत रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे, त्यांच्यासाठी हे मशीन फायदेशीर ठरणार आहे.

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्या मुंबईत रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे, त्यांच्यासाठी हे मशीन फायदेशीर ठरणार आहे.

    मुंबई, 23 जुलै : कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) बचावासाठी मास्क (mask) आणि सॅनिटायझर (sanitizer) हे महत्त्वाचं आहे. आपल्या दैनंदिन आयुष्याचा तो एक भाग झाला आहे. घराबाहेर पडताना मास्क लावून आणि सॅनिटायझर घेऊनच आपण निघतो. मात्र घाईबडीत तुम्ही मास्क, सॅनिटायझर विसरलात आणि आता तुम्ही रेल्वे स्टेशनवर पोहोचला असाल तर काळजी करण्याची गरज नाही. मुंबईतल्या रेल्वे स्थानकावर (mumbai railway station) असं वेंडिंग मशीन (vending machine) लावण्यात आलं आहे, ज्यातून तुम्हाला मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध होईल. दादर सेंट्रल रेल्वे स्टेशनवर हे मास्क आणि सॅनिटायझर वेंडिंग मशीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इतर वेंडिंग मशीनप्रमाणेच हे मशीनही काम करतं. मशीनमध्ये पैसे टाका आणि तुम्हाला हव्या असलेल्या वस्तूचा कोड टाकून ती वस्तू मिळवा. या मशीनमध्ये मशीनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. एकदाच वापरता येणाऱ्या मास्कपासून ते एन 95 मास्कपर्यंत सर्व मास्क उपलब्ध होतील. शिवाय फक्त 50 ते 100 रुपयांमध्ये हँड सॅनिटायझरही मिळेल आणि ज्यांना ग्लोव्हज हवेत त्यांना ग्लोव्ह्जही मिळतील. कोरोनाव्हायरसच्या या काळात ग्लोव्ह्ज, मास्क आणि सॅनिटायझर खूप महत्त्वाचं झालं आहे. मुंबईत बहुतेक लोक लोकल ट्रेनने प्रवास करतात. अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी आता लोकल सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे सध्या दादर सेंट्रल रेल्वे स्टेशनवर हे वेंडिंग मशीन लावण्यात आलं आहे. लवकरच इतर स्टेशनवरही असा वेंडिंग मशीनच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना मुंबई रेल्वे प्रशासनाची आहे. हे वाचा - वॅक्सीनं आलं तरी कोरोना संसर्गाचा धोका आणि भीती किती कमी होणार? महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसचा उद्रेक व्हायच्या मार्गावर आहे. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार एकाच दिवसात 10576 कोरोना रुग्णांचं निदान झालं. 24 तासांत पाच आकडी नवे रुग्ण सापडण्याचा हा पहिलाच दिवस आहे. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 337607 3 लाख 37 हजार 607 एवढी झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 12,556 वर गेला आहे. राज्यभरात उपचार सुरू असलेले (Active corona patients) तब्बल 1,36,980 रुग्ण आहेत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या