Home /News /mumbai /

Coronavirus: मास्क न घातल्याने मार्शलने लावला दंड, वाहनचालकाने बोनेटवर नेले फरपटत

Coronavirus: मास्क न घातल्याने मार्शलने लावला दंड, वाहनचालकाने बोनेटवर नेले फरपटत

मास्क (Mask) घातला नाही म्हणून स्थानिक मार्शलने (Marshal) एका वाहनचालकाने त्यांना चारचाकी वाहनाने लांबपर्यंत फरपटत नेल्याची घटना मुंबईत (Mumbai) घडली आहे. गाडीच्या बोनटवर काही मिनीटे तो मार्शल पडलेला होता. त्यामुळे आता विनामास्क फिरणाऱ्यांचा मोठा मनस्ताप पोलिसांना (Mumbai Police) सहन करावा लागत आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 7 सप्टेंबर : मास्क (Mask) घातला नाही म्हणून स्थानिक मार्शलने (Marshal) एका वाहनचालकाने त्यांना चारचाकी वाहनाने लांबपर्यंत फरपटत नेल्याची घटना मुंबईत (Mumbai) घडली आहे. गाडीच्या बोनटवर काही मिनीटे तो मार्शल पडलेला होता. त्यामुळे आता विनामास्क फिरणाऱ्यांचा मोठा मनस्ताप पोलिसांना (Mumbai Police) सहन करावा लागत आहे. एका वाहनाच्या आत वाहनचालकाने मास्क घातलेला नाही हे बघितल्यावर स्थानिक मार्शल सुरेश यांनी त्याला अडवून 200 रूपयांची पावती फाडली. त्यामुळे चिडलेल्या वाहनचालकाने थेट त्यांच्या अंगावर गाडी घातली. समोर उभा असलेला मार्शल सुरेशला त्याने बोनटद्वारे पुढे फरपटत नेले. त्यांनी त्याला गाडी थांबवण्यास सांगितले तरी तो काही थांबला नाही. मुळात ही घटनी 2 सप्टेंबरची आहे, परंतु आता सोशल मिडीयाच्या माध्यमातून हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने हा मुद्दा आता चर्चेत आला आहे. त्यामुळे आता बेशिस्त वाहनचालकांमुळे सुरक्षारक्षकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

  ....मग RSS च्या प्रमुखपदी सरसंघचालक म्हणून मुस्लीम व्यक्तीला बसवणार का? संभाजी ब्रिगेडचा थेट सवाल

  आता या प्रकरणामुळे कोरोना नियमांचं पालन होत नसल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. दरम्यान आजच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत कोरोनाची तिसरी लाट आल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता ऐन गणेशोत्सवाच्या काळात लॉकडॉऊन लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासंदर्भात लॉकडॉऊन लावण्याचे संकेत याआधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात टाळेबंदी होण्याची शक्यता आहे. आता नागपूरातही कोरोना रूग्ण वाढत असून नागपूरात तिसरी लाट आल्याची घोषणा पालकमंत्री नितिन राऊत यांनी केली आहे.
  Published by:Atik Shaikh
  First published:

  Tags: Coronavirus cases, Face Mask, Mumbai, Police arrest

  पुढील बातम्या