शहीद कौस्तुभ राणे यांची पत्नी सैन्यात, शत्रूशी लढण्याची इच्छा पूर्ण करणार

शहीद कौस्तुभ राणे यांची पत्नी सैन्यात, शत्रूशी लढण्याची इच्छा पूर्ण करणार

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांची घुसखोरी रोखताना शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणे यांची वीरपत्नी कनिका लवकरच सैन्यात दाखल होणार आहेत. कौस्तुभ यांच्या प्रथम स्मृतिदिनी कनिका यांना लष्कराकडून नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

  • Share this:

मुंबई, 29 जुलै- काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांची घुसखोरी रोखताना शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणे यांची वीरपत्नी कनिका लवकरच सैन्यात दाखल होणार आहेत. कौस्तुभ यांच्या प्रथम स्मृतिदिनी कनिका यांना लष्कराकडून नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये त्या सैन्यात प्रशिक्षण घेण्यासाठी रुजू होणार आहेत. शत्रूशी लढण्याची पतीची इच्छा आपण पूर्ण करणार असल्याचे कनिका यांनी म्हटले आहे

सरकारने देऊ केलेली नोकरी नाकारली..

मूळचे सिंधुदुर्ग येथील राहणारे मेजर कौस्तुभ राणे यांना 7 ऑगस्ट 2018 रोजी वीरमरण आले होते. त्यानंतर राज्य सरकारने देऊ केलेली सरकारी नोकरी वीरपत्नी कनिका यांनी नाकारली होती. कनिका यांनीही सैन्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला होता. कनिका यांनी अधिकारी पदाच्या परीक्षेत उत्तम यश मिळवले. त्यानंतर त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

मी सुखरूप आहे, कौस्तुभ एवढाच संदेश देत..

29 वर्षांचे मेजर कौस्तुभ राणे यांना मेजरपदी प्रमोशन मिळाले होते. आपल्या सहा वर्षांच्या सेवेत त्यांनी प्रत्येक क्षण देशासाठी जगण्याची कौस्तुभ यांनी शपथ घेतली होती. आणि ही शपथ राणे यांनी शेवटपर्यंत पाळली. सीमारेषेवर त्यांना काही दहशतवादी घुसखोरी करत असल्याचे दिसले. दोन्हीकडून जोरदार फायरिंग करण्यात आली. या फायरिंगमध्ये कौस्तुभ राणे शहीद झाले. घरातील एकुलता एक मुलगा असल्याने साहजिकच त्यांच्या कुटुंबियांना त्यांची काळजी असणार. मात्र, जम्मू- काश्मिरमध्ये पोस्टिंग झाल्याने तिथे नेटवर्क मिळत नव्हता. त्यामुळे कित्येक दिवस कौस्तुभ यांचा घरच्यांशी संपर्क होत नव्हता. मात्र, जेव्हा नेटवर्क मिळायचे तेव्हा ते घरच्यांना फोन करायचे. अनेकदा त्यांचा फोन हा रात्री 2-3 वाजताच यायचा. तेव्हा फोन करुन, 'मी सुखरूप आहे', एवढाच संदेश ते द्यायचे. आता, मात्र त्यांचा मी सुखरूप असल्याचा फोन रात्री- मध्यरात्री येणार नाही, या दु:खातून त्यांचे कुटुंबीय अजून बाहेर निघालेले नाहीत. कौस्तुभ यांच्या पश्चात त्यांची पत्नी कनिका, दोन वर्षाचा मुलगा, आई- वडील आणि एक बहीण आहे.

कनिका यांनी व्यक्त केली होती ही खंत

कनिका या मुंबईत एका अधिकाऱ्याकडे गेल्या असता त्यांनी स्वत:ची ओळख करून दिली. त्यावेळी ते म्हणाले, 'वो मीरा रोड मै हुवा था वो..सब बडे बडे फूल लगे थे... असं ऐकल्यावर आम्हाला काय वाटतं? आपल्याच शहरातील लोकांना त्यांच्याच शहरातील शहिदांची माहिती नाही.' अशी खंत शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका राणे यांनी व्यक्त केली होती.

दरम्यान, लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या महाराष्ट्रातील जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देऊ केली. त्यात काश्मिरमध्ये शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नीलाही पाच लाखांची मदत देण्यात आली.

VIDEO : शहीद मेजर राणेंच्या पत्नीची खंत, तुम्हालाही विचार करायला भाग पाडेल!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 29, 2019 09:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading