Home /News /mumbai /

'कोरोना'मुळे शेअर बाजारात हाहाकार, एकाच दिवसात बुडाले तब्बल 12.74 लाख कोटी!

'कोरोना'मुळे शेअर बाजारात हाहाकार, एकाच दिवसात बुडाले तब्बल 12.74 लाख कोटी!

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील बाजारपेठांना मोठा फटका बसला आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहण्यास मिळाली

    मुंबई, 23 मार्च : कोरोना व्हायरसमुळे जगभरातील बाजारपेठांना मोठा फटका बसला आहे.  आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहण्यास मिळाली आहे. सेन्सेक्स जवळपास 4000 अंकांनी घसरला आहे तर निफ्टी 1150 अंकांवर बंद झाला आहे. आज दिवसभरात  गुंतवणुकदारांचं तब्बल 12.74 लाख कोटींचं नुकसान झालं आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरातील बाजारापेठेवर मोठा परिणाम दिसून येत आहे. गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात याची झळ पोहोचत आहे. एकाच महिन्यात दुसऱ्यांना शेअर बाजार गडगडला आहे.  महिन्याभरात दुसऱ्यांना 10 टक्के लोअर सर्किट लागला आहे.  एकाच महिन्यात दोनदा लोअर सर्किट लागले आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार उघडताच मोठी घसरण झाली. त्यानंतर बाजार बंद करण्यात आला होता.  बाजार पुन्हा सुरू झाला पण आकडे आणखी घसरले होते. सेन्सेक्स जवळपास 25900 आणि निफ्टी 7588 अंकांवर सुरू आहे.  डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव हा 76.06 रुपये आहे. शेअर बाजारातील ही एकाच महिन्यातील दुसरी मोठी घसरण आहे. सकाळची सुरुवात सेन्सेक्स  2700 अंकांनी झाली तर निफ्टी 8000 अंकांनी गडगडला. गुंतवणुकदारांचे तब्बल 12.74 लाख कोटी बुडाले आज सकाळी पहिल्या एका तासात गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटींपेक्षा नुकसान झालं आहे. यावेळी प्रमुख शेअर्सवर 10 टक्के अधिक प्रमाणात तुटला होता. आज दिवसभरात  गुंतवणुकदारांचे तब्बल 12.74 लाख कोटींचं नुकसान झालं आहे.  तर दुसरीकडे मार्चमध्ये गुंतवणुकदारांचे 42.46 लाख कोटी बुडाले आहे. शेअर बाजार उघडला असता बजाज फायनन्स, अॅक्सिस बँक, BPCL, ONGC, मारूती सुझुकी, आयसीआयसीआई बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, अदानी पोर्ट्स, बजाज फिन्सर्व, ग्रासिम, टाइटन कंपनी, हीरो मोटोकॉर्प, रिलायन्स, IOC, वेदांता, आयशर मोटर्स, टाटा मोटर्स, इन्फोसिस, टाटा स्टील आणि टेक महिंद्रा यांचे शेअर कमी अंकाने सुरू झाले.  तर दुसरीकडे डबघाईला आलेल्या येस बँकेच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या